Ajit pawar: राज्यात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी शिबिरे घेतली आहेत. शिर्डी, रायगडनंतर विदर्भात शिबिराचं आयोजन केलं असून यंदा भाषणांना फाटा देऊन कृतीशील कार्यक्रम राबवले जात आहेत. तळागाळातील प्रश्न माझ्याकडे येतील, अर्थमंत्री म्हणून त्या समस्यांचा ऑन रेकॉर्ड उल्लेख करता येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. पालकमंत्री नाराजी विषयावर बोलताना पवार म्हणाले, "मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे पक्षालाही वेळ द्यावा लागतो. कोण काय काम करतं याची मी नोंद घेतली आहे.  विदर्भातील सात जागांपैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली, सातवी जागा मैत्रीपूर्ण करावी लागली आणि पराभव पत्करावा लागला, याची कबुलीही त्यांनी दिली. यंदा मात्र वेगळ्या पद्धतीने गटचर्चांमधून प्रश्न संकलित करण्याचं धोरण त्यांनी स्पष्ट केलं. केवळ पक्षामुळे मी उपमुख्यमंत्री असून बाकी लोक मंत्री आहेत. त्यामुळे पक्षाला वेळ द्यावा लागेल मी कोण काम करत याची नोंद घेतली आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना इशारा दिला. 

Continues below advertisement

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार 

देवेंद्र फडणवीस–नितीन गडकरींबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "एनडीएमध्ये अनेक घटक पक्ष आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आमचं काम वाढीसाठी आहे, आव्हान देण्यासाठी नव्हे." छगन भुजबळांच्या वक्तव्यांवर भाष्य करताना त्यांनी संतुलन साधलं. "लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण समाजात तेढ निर्माण न करता सदसदविवेकबुद्धीने वागलं पाहिजे," असं ते म्हणाले.

कुणाच्याही तोंडचा घास काढणार नाही

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी सांगितलं की, कुणाच्याही तोंडचा घास काढणार नाही. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हैदराबाद गॅझेट, बंजारा-वंजारी वादाविषयी ते म्हणाले की, "एससी-एसटी प्रवर्गातील बदल हा संसदेतल्या निर्णयाचा अधिकार आहे. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, उथळ लोकांना वाटतं तेच बोलू शकतात. पण सगळ्यांनी तारतम्याने वागलं पाहिजे. पुण्यातील गुन्हेगारीवर त्यांनी कठोर भूमिका घेत त्यांनी सांगितले की, स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. कुणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही, वेळप्रसंगी मोक्का लागू, असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत या प्रश्नावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं, "प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. मनमोहन सिंग यांनीही सलग पत्रकार परिषद घेतल्या नव्हत्या."

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या