नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील चार पोलिस उपनिरीक्षक आणि दोघा पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. कुख्यात गुंड आबू खानला ड्रग विक्रीसाठी मदत केल्याचा या सहा जणांवर आरोप आहे.
साजिद मोवाल, शरद शिंपणे, निलेश पुरभे, मनोज ओरके अशी निलंबित पोलिस उपनिरीक्षकांची नावं आहेत, तर जयंता शेलोट आणि शाम मिश्रा अशी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
गुंड आबू खानशी संपर्क ठेवून त्याला अंमली पदार्थाची तस्करी आणि अवैध विक्रीसाठी मदत केल्याचा पोलिसांवर आरोप आहे. विशेष म्हणजे जयंता शेलोट तर आबू खानसोबत पार्टीत नाचतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.
नागपूर पोलीस दलातील अधिकारी अंमली पदार्थाची तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगाराच्या सतत संपर्कात होते, हे लाजिरवाणं तथ्य चौकशीत समोर आलं. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही कारवाई केली.
आबू खानच्या 1200 कॉल रेकॉर्ड्समधून अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे क्रमांक समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गुंड आबू खानला ड्रग तस्करीत मदत, सहा पोलिसांचं निलंबन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2019 12:40 PM (IST)
नागपुरात साजिद मोवाल, शरद शिंपणे, निलेश पुरभे, मनोज ओरके या पोलिस उपनिरीक्षकांना, तर जयंता शेलोट आणि शाम मिश्रा या पोलिस कर्मचाऱ्यांना गुंड आबू खानला ड्रग विक्रीसाठी मदत केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -