मुंबई पोलिस, नागपूर पोलिस सोशल मीडियावर अत्यंत कल्पक पद्धतीने वाहतुकीच्या नियमांविषयी सांगताना दिसतात. मुंबई पोलिसांनी 'गली बॉय'च्या मीम्सचा आधार घेत ट्वीट केले, तर नागपूर पोलिसांनी राधिका आपटेच्या 'ए, देख के चलो'वरुन सल्ले दिले आहेत.
'व्हॅलेंटाईन्स डे' (Valentine's day) मधील एक-एक अक्षरं निखळून पडतात आणि अखेरीस उरलेल्या 'ay' मधून ए, भाई जरा देख के चलो, असा सल्ला पोलिस नागरिकांना देतात.
पोलिसांच्या या क्रिएटिव्ह सल्ल्याचा कित्ता गिरवत अनेक ट्विटराईट्सनी ट्वीट केले आहेत. 'ए, मालिक तेरे बंदे हम' पासून 'ए बंटी तेरा साबुन स्लो है क्या'पर्यंत अनेक गाणी आणि संवाद यानिमित्ताने वाचायला मिळाले.