Schemes for Nagpur District Students : राज्य सरकारतर्फे (Government of Maharashtra) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना, शिष्यवृत्ती आणि पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल.


महाज्योती मार्फत पोलीस- सैन्यदल भरतीसाठी...


महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस– सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अंतिम दि.25 जानेवारी 2023 आहे. पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. महाज्योतीमार्फत प्रशिक्षण  नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. 


चार महिन्यांचे प्रशिक्षण, सहा हजार रुपये विद्यावेतनही...


प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा असून प्रशिक्षण हे अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह 6 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश व बूट देखील देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in  या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती - भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे. 


मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी असा करा अर्ज


नागपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना सन 2022-23 वर्षात महाडीबीटी या पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज भरण्याकरीता 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरून घ्यावे तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गाचे अर्ज तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरीता सादर करावे. अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 


अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क...


अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 2221041. ईमेल- sdswo.nagpur@gmail.com  किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, नागपूर येथे संपर्क साधावा.


ही बातमी देखील वाचा...


बदलीनुसार 'टेबल' बदलले मात्र 'काम' तेच; नागपूर जिल्हा परिषदेत मर्जीतील कर्मचाऱ्यांवर 'विशेष कृपा'


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI