Samruddhi Mahamarg Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह... समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Samruddhi Mahamarg Nagpur Live Updates : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 11 Dec 2022 12:44 PM
PM Modi LIVE : नागपुरातून पंतप्रधान मोदी लाईव्ह... मराठीतून भाषणाला सुरुवात...

नागपुरातून पंतप्रधान मोदी लाईव्ह... मराठीतून भाषणाला सुरुवात...



Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह...

Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह...





AIIMS Nagpur : पंतप्रधानांचे व्यासपीठावर आगमन...



PM Narendra Modi in Nagpur : विविध प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स परिसरात आयोजित मुख्य कार्यक्रमात दाखल झाले आहेत. उपस्थित हजारो नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.

AIIMS Nagpur : पंतप्रधानांची एक झलक बघण्यासाठी रस्त्यांवर गर्दी



PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं एम्स रुग्णालय परिसरात आगमन झालं आहे. थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते एम्स रुग्णालय राष्ट्राला अर्पण करण्यात येईल. त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येत नागपूरकर रस्त्यांवर उतरले आहेत.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन; पंतप्रधानांचा ताफा एम्सच्या दिशेने रवाना



PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आह. नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा मार्ग आता नागरिकांसाठी सुरु झाला असून पंतप्रधानांचा ताफा एम्सच्या दिशेने रवाना झाला आहे. पंतप्रधान मोदी एम्स रुग्णालयाच्या दिशेने निघाल्याचे कळताच एम्स मधील कार्यक्रमस्थळी मोदी मोदी घोषणांना सुरुवात झाली आहे.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग ठरणार गेमचेंजर! पंतप्रधानांचे लोकार्पणस्थळी आगमन



PM Narendra Modi in Nagpur : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी 520 किमीचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी मुख्य कार्यक्रम स्थळी वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधानांच्या ताफ्याचे आगमन झाले आहे. याठिकाणी ढोल पथकाने वादनाद्वारे पंतप्रधानांचे स्वागत केले.

Vande Bharat Express: पंतप्रधानांकडून वंदेभारत एक्स्प्रेसमधील प्रवाशांसी संवाद



PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. तसेच यावेळी त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसमधील प्रवाशांशीही संवाद साधला. सोमवार ते शनिवार ही एक्स्प्रेस धावणार आहे. सध्या पंतप्रधानांचा ताफा समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉइंटकडे रवाना झाला आहे.

Samruddhi Mahamarg : पंतप्रधानांचा ताफा समृद्धी महामार्गाच्या दिशेने रवाना



PM Narendra Modi in Nagpur : नागपूर मेट्रोच्या खापरी स्टेशनवरील कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा समृद्धी महामार्गाच्या दिशेने रवाना झाला आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी 520 किमीचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Nagpur Metro : पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या फेज टू चे भूमिपूजन

PM Narendra Modi in Nagpur : नागपूर मेट्रोच्या पहिल्या फेजचे लोकार्पण आणि मेट्रो प्रकल्पाच्या फेज टू चे भूमिपजून करत आहेत.

थोड्याच वेळात पंतप्रधान पोहोचणार खापरी मेट्रो स्टेशनवर ;  'या' प्रकल्पांचे लोकार्पण

PM Narendra Modi in Nagpur : फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशनवरुन पंतप्रधान खापरी पर्यंत नागपूर मेट्रोने प्रवास करत आहेत. काही क्षणातच ते खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील. त्यानंतर एम्सच्या मुख्य कार्यक्रमातून पंतप्रधान मंचावरून भारतीय रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्प, अजनी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आणि बाराशे एचपीच्या लोकोमोटीव्ह सर्व्हिस सेंटर चे उद्घाटन करणार आहे. यासोबतच नागपूर मेट्रो रेल परियोजनाच्या फेज 1 चे औपचारिक लोकार्पण आणि फेज 2 चे भूमिपूजन करणार आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) नागपुर चे राष्ट्राला समर्पण करणार आहेत. यासोबतच सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (म्हणजेच सीटीएस) चंद्रपूर, महाराष्ट्राचे लोकार्पण करतील. यानंतर नागपूर महानगरपालिका तर्फे नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Nagpur Metro : पंतप्रधान थोड्याच वेळात करणार नागपूर मेट्रो फेजवन मध्ये प्रवास



PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील सीताबर्डी येथील फ्रिडम पार्क ते खापरी या मेट्रोच्या फेजवनमध्ये प्रवास करणार आहे. तसेच पहिल्या फेजमधील रीच 2 आणि रीच 3 चे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच खापरी येथे मेट्रोच्या फेज टू चे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. आठ किलोमीटरचा ते मेट्रो प्रवास पंतप्रधान करणार असून सुमारे 30 मिनिटांचा वेळ लागणार आहे.

Nagpur Metro : दुपारी बारा वाजतापासून दर 15 मिनिटांनी चारही दिशेने मेट्रो फेऱ्या

PM Narendra Modi in Nagpur : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण झिरो माइल्स फ्रीडम पार्क स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ते नागपूर मेट्रोच्या प्रदर्शनीची पाहणी करुन फ्रिडम पार्क ते खापरीपर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहे. मेट्रो रेल्वे 11 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपासून नागपूरच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशेला दर 15 मिनिटांनी धावणार आहे. पहिल्या फेजमधील दोन मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Nagpur Metro : थोड्याच वेळात पंतप्रधान मेट्रोच्या फ्रिडम पार्कमध्ये होणार दाखल

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून मेट्रोच्या सीताबर्डी येथील फ्रिडम पार्क मेट्रो स्थानकाच्या दिशेने रवाना झाले आहे. ते खापरीपर्यंत मेट्रोने प्रवास करतील. तसेच मेट्रोच्या फेज 2 चे भूमिपूजन करणार आहे.

Vande Bharat Express: पंतप्रधानांकडून वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, आठवड्यातून सहा दिवस नागपूर ते बिलासपूर धावणार

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सोमवार ते शनिवार ही एक्स्प्रेस धावणार आहे. सध्या एक्स्प्रेस बिलासपूरच्या दिशेने रवाना.

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरील कंत्राटदाराचा आत्मदहनाचा इशारा

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गासाठी केलेल्या कामाचे 42 लाख रुपये थकबाकी असल्याने कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील कंत्राटदार प्रकाश थोरात यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे...खंडाळा येथील शुभम कन्स्ट्रक्शनचे प्रकाश थोरात यांनी रोडवे सोल्युशन इंडिया कंपनीकडून 2020 मध्ये सेंटरिंग आणि इतर काम घेतले होते, सुरुवातीला संबंधित कंपनीने पैसे दिले मात्र, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप प्रकाश थोरात यांनी केलाय. सध्या कंपनीकडे आपले 42 लाख रुपये अडकले असल्याने याबाबत सातत्याने संबंधित कंपनी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने आपण लोकार्पण कार्यक्रमावेळी आत्मदहन करणार असल्याचा इशारा थोरात यांनी दिलाय.


पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच्या पहिल नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत त्यातच अशा पध्दतीने कंत्राटदाराने आत्मदहनाचा इशारा दिलाय. 
Vande Bharat Express: पंतप्रधानांचा ताफा नागपूर रेल्वे स्थानकात दाखल; थोड्याच वेळात नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधानांचा ताफा सीताबर्डी येथील रेल्वे स्थानकावर नुकताच दाखल झाला असून थोड्याच वेळात ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस हिरवा झेंडा दाखवणार आहे. सोमवार ते शनिवार, आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. थोड्याच वेळात रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरुन ते वंदे भारत एक्स्प्रेस हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये 2 श्रेणीच्या आसन व्यवस्थेचा समावेश असून यात चेअरकार आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. इतर एक्स्प्रेस गाड्यांशी तुलना केल्यास, चेअरकारची सीट थर्ड एसी सारखी असेल, तर 2 एसी आणि फर्स्ट एसी सारखी आरामदायी एक्झिक्युटिव्ह चेअर कार असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत...

Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरच्या विमानतळावर त्यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत केले.

Nagpur : पंतप्रधानांचा ताफा रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना

PM Narendra Modi in Nagpur : विविध विकास कामांच्या भूमिपजून आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपुरात आगमन झाले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. सध्या पंतप्रधानांचा ताफा विमानतळावरुन नागपूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाला आहे.

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आकर्षक सजावट; पंतप्रधान 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दाखवणार हिरवा झेंडा

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले असून ते थोड्याच वेळात सीताबर्डी येथील रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रयाण करतील. आज पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यामुळे नागपूर ते बिलासपूर प्रवास फक्त साडेपाच तासांत शक्य होणार आहे.

Nagpur Metro : मेट्रोच्या चारही दिशा...; दुपारी बारा वाजतापासून दर 15 मिनिटांनी मेट्रो फेऱ्या

PM Narendra Modi in Nagpur : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण झिरो माइल्स फ्रीडम पार्क स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 10 वाजता होणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 ऑगस्ट 2014 ला झाला होता. हे विशेष महत्त्वाचे म्हणजे, मेट्रो रेल्वे 11 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपासून नागपूरच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशेला दर 15 मिनिटांनी धावणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे नागपूरची भाग्यरेषा आणि नागरिकांची लाइफस्टाइल बदलणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल

PM Narendra Modi : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळावर हजर झाले आहेत.


 

Nagpur : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचे बुलढाण्यात लाईव्ह स्क्रिनिंग

PM Narendra Modi in Nagpur : आज समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील टोल प्लाजावर दाखवण्यात येणार आहे. या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांच्यासह सुमारे दोन ते तीन हजार नागरिक या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. टोल प्लाजा वर एक मोठा स्क्रीन लावून त्यावर थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व तयारी झाली असून थोड्याच वेळात या ठिकाणी प्रक्षेपणाला सुरुवात होणार आहे.

Nagpur : नागपूर एअरपोर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 9.30 वाजता होईल आगमन

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात येणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचं उदघाटन आणि भूमिपूजन होणार आहे. यावेळी संपूर्ण नागपूर शहर भगवामय झालं आहे. ज्याची वाट संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्र वाट पाहत होते ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. यासोबतच समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटर पर्यंत सफर सुद्धा ते करतील. प्राप्त माहितीनुसार पंतप्रधानांचे आगमन 9.30 वाजता विमानतळावर होणार आहे.

Nagpur : समृद्धी महामार्गाचे आठ ठिकाणी उद्घाटन

PM Narendra Modi in Nagpur : समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा एकूण आठ ठिकाणी होणार आहे. नागपूरमध्ये प्रत्यक्ष तर वर्धा, वाशीम, शिरडी, जालना, बुलढाणा, औरंगावाद येथे तो ऑनलाईन होणार आहे. त्याच जिल्ह्यातील आमदार, मंत्री व लोकप्रतिनिधी तेथून यात सहभागी होणार आहेत.

Nagpur : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागपुरातील रस्ते भगवामय 

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यात ज्या ज्या रस्त्यावरून जाणार ते सर्व रस्ते भगवामय करण्यात आले आहे. ठिकठिकाणी भाजपच्या झेंड्याच्या रंगाचे भगवे आणि हिरव्या रंगाचे फुगे व तोरण लावण्यात आले आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या हजारो झेंड्यानी संपूर्ण रस्ते फुलून गेले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मोठा राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचा चित्र आहे. 

PM Modi in Nagpur : पंतप्रधानांचा नागपूर दौरा ; हे मार्ग राहतील बंद

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना, त्या ठिकाणची वाहतूक काही वेळेसाठी बंद राहणार असन नागरिकांचा त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे शहर पोलिसांकडून सागंण्यात आले आहे.


हे मार्ग राहतील बंद


• रेल्वेस्टेशन परिसरातील मुख्यद्वार सामान्य प्रवाशांसाठी सकाळी 7.30 ते 11 वाजतापर्यंत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील नागरिकांना पूर्वेकडील द्वारातून (संत्रामार्केट) प्रवेश घ्यावा लागणार आहे. 
• आरबीआय ते एलआयसी मार्ग बंद
• सदर ते जयस्तंभ चौकापर्यंतचा रस्ता बंद करण्यात येईल.
• रामझुल्यावरील रहदारीही या काळात बंद करण्यात येणार आहे.
• लोहापूल ते मानस चौकांपर्यतची वाहतूक बंद करण्यात येईल.
• वर्धामार्गावरील पंतप्रधानांच्या ताफ्याच्या वाहतुकीदरम्यान उड्डाणपूलही यावेळी बंद करण्यात येईल.

पार्श्वभूमी

PM Modi to visit Maharashtra Nagpur: आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. अवघ्या काही तासांनी पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे... समृद्धी महामार्गावर पंतप्रधानांच्या आगमन आणि उपस्थितीच्या वेळी या ठिकाणी काही वेळासाठी सर्वांनाच प्रवेश बंद राहणार आहे.


पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा 2 ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.


पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वन हेल्थ संस्था , नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार  आहेत.   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.