नागपूर :  आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election)  भावना भडकावून मतं मिळवण्याचे प्रयत्न होणार आहे.  अशा गोष्टींपासून दूर राहा असे आवाहन  सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)  यांनी जनतेला केले आहे. तसेच राक्षसी शक्तींना बाह्यशक्तींचाही पाठिंबा मिळत असल्याचे वक्तव्य  मोहन भागवत यांनी केले आहे. सरसंघचालक रेशीम बागेतील दसरा मेळाव्यात बोलत होते. 


सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले,  येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात.   समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे.


योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय


कोणीही कितीही चिथावणी दिली तरी प्रत्येक परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करत, नागरी शिस्त पाळून, आपल्या घटनेने दिलेल्या संकेतांनुसार आचरण अनिवार्यपणे करायला हवे. स्वतंत्र देशात ही अशी वागणूकच देशभक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. प्रसारमाध्यमांतून होणारा चिथावणी देणारा भडकाऊ अपप्रचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या स्पर्धेत आपण अडकू नये , असे देखील सरसंघचालक या  वेळी म्हणाले.  सुसंघटित सामर्थ्यसंपन्न समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय आहे, असेही मोहन भागवत म्हणाले. 


राक्षसी शक्तींना बाह्य शक्तींचाही पाठिंबा मिळत आहे


राक्षसी शक्तींना बाह्य शक्तींचाही पाठिंबा मिळत आहे. योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय  आहे. दशकभर शांतता असलेल्या मणिपूरमध्ये अचानक हिंसा कशी उफाळली असा सवाल सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. संघर्षाला जातीय आणि धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला असा सवाल त्यांनी केलाय.  


इंडिया आघाडीवर नाव न घेता टीका 


राजकीय स्वार्थासाठी अनिष्ट शक्तिंशी युती करण्याचा अविवेक केला जातोय. अशा राक्षसी शक्तिंना बाह्य शक्तिंचाही सहज पाठिंबा मिळू शकतो असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. इंडिया आघाडीचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली. 


हे ही वाचा :


Mohan Bhagwat : लोकसभेत जनतेला सावध राहण्याचं आवाहन ते इंडिया आघाडीवर नाव न घेता टीका; मोहन भागवतांच्या भाषणातील 10 मुद्दे