PM Kisan Samman Nidhi Yojana 10th instalment : पीएम किसान योजनेअंतर्ग केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक केली जाते. डिसेंबर 2018 मध्ये सुरु झालेल्या या योजनाचा दहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. डिसेंबर महिन्यात केंद्र सरकार दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा दहावा हप्ता 15 डिसेंबरच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नवव्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर नवव्या आणि दहाव्या हप्त्याचे पैसे एकत्रच म्हणजेच 4000 हजार रुपये जमा होऊ शकतात.
पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.
1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
काय आहे पीएम किसान योजना?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 ऐवजी 5000 रुपये येणार, मिळणार अतिरिक्त फायदा
पंतप्रधान किसान योजनेवरुन राज्यातील कृषी आणि महसूल विभागात मानापमान नाट्य