Nagpur News : दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणारे प्रवासी वाढल्याने नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर (Nagpur Junction railway station) प्रवाशांची गर्दी दुप्पट वाढली आहे. यात अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. चारही बाजूने येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या हाऊसफुल असल्याने लांबचा प्रवास कसा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यत: मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, हैद्राबाद दिल्ली, बनारस, पटणा आदी मार्गावर सर्वाधिक प्रवासी संख्या दिसून येत आहे. यातही उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी असताना प्रवास करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. पूर्व आणि उत्तरेकडील मार्गांवर धावणाऱ्या बहुतांश गाड्यांना दीर्घकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक रेल्वेगाड्यांमध्ये वेटिंग तिकीटही (Waiting Tickets) उपलब्ध नसल्याचे अन्य पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.


सीट मिळत नसल्याने अडचण  


विशेषत: संघमित्रा एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्सप्रेस, सिकंदराबाद-दानापूर सुपरफास्ट, केरळ एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, तामिळनाडू एक्सप्रेस, यशवंतपूर संपर्क क्रांती, कर्नाटक संपर्क क्रांती, सेवाग्राम, सीएसएमटी दुरांतो, नागपूर दुरांतो, विदर्भ एक्सप्रेस, नागपूर-पुणे आणि पुणे- नागपूरच्या प्रवाशांना बर्थ (No Seats Available in Train) मिळत नसल्याचे अडचणी वाढल्या आहे. कोरोनाच्या संकट काळानंतर पहिल्यांदाच अनेकजण दिवाळीचा सण थाटामाटात साजरा करण्यासाठी आपआपल्या गावी जात आहे. मात्र गर्दीचा फटका सहण करीत प्रवास करण्याची वेळ रेल्वे प्रवाशांवर आली आहे. 


दुहेरी आर्थिक फटका


दसऱ्याच्या पूर्वी 50 हून अधिक रेल्वेगाड्या रद्द (train cancelled) करण्यात आल्या होत्या. अनेक मार्गावर दुरूस्तीचे काम अद्याप सुरूच असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहण करीत प्रवास करण्याची वेळ आली आहे. बहुतांश पहिल्यांदाच दिवाळीत सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. अनेकांनी तर काही महिन्यापूर्वीच तिकीट काढले असताना बर्थ मिळत नसल्याची तक्रारी आहे. अशा परिस्थितीत आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र यामुळे प्रवाशांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. 


कोचची संख्या वाढवा


रेल्वे तिकीट तपासणी मोहीम राबवून रेल्वे प्रशासन दररोज लाखो रुपयांचा दंड वसूल करीत आहे. तर दुसरीकडे रेल्वे अधिकाऱ्यांच्या या मनमानीमुळे प्रवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मध्य रेल्वे प्रवासी संघटनांनी आरोप केला आहे की रेल्वे अधिकाऱ्यांनी गाड्यांमधील स्लीपर कोचची संख्या वाढवावी. जेणेकरुन प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल. 


विशेष गाड्या, तरी समस्या कायम


नागपूर ते मुंबई विशेष गाड्यांची संख्या कमी असल्याने समस्या कायम असून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष शुल्क आकारून नागपूर ते मुंबई 2 एकेरी विशेष गाड्यांची संख्या वाढवावी. सध्याच्या घडीला रेल्वेने 01076 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन वे स्पेशल 15 ऑक्टोबर रोजी नागपूरहून सोडण्याचे ठरविले आहे. ही ट्रेन 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. 01078 नागपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल 18 ऑक्टोबर रोजी नागपूरहून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या


World Food Day : नागपूरकरांचा 'चिवडा स्पेशल संडे'; विष्णू मनोहरांचा अडीच हजार किलोचा 'महा-चिवडा'


मोगलांना संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना सर्वत्र शिंदे-फडणवीस दिसतात : चंद्रशेखर बावनकुळे