नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील (Nagpur Railway Division) दहा स्थानकांवर आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. त्याची रचना अहमदाबादमध्ये (Ahmedabad, Gujarat) तयार करण्यात आली असून ही रचना पाहण्यासाठी नागपुरातील रेल्वे अधिकाऱ्यांना (Officers from Nagpur Railway Division) अहमदाबादला पाठवण्यात आले आहे. विदर्भातील समृद्ध परंपरागत वारसा (Vidarbha Culture) रेल्वे स्थानकांवर दिसणार आहे. वन स्टेशन वन प्रोडक्ट योजनेच्या (One Station One Product) अंमलबजावणीसाठी रेल्वेकडून वेगाने काम केल्या जात आहे. स्टॉल्समध्ये एकसमानता राखण्यासाठी सर्व स्थानकांवर एकासारखेच डिझाइनचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.


रेल्वेकडून मोफत स्टॉल्स


मुख्यत: ही योजना प्रायोगिक तत्त्वावर काही स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी रेल्वेकडून जागा दिल्या जात होती. मात्र आता विक्रेत्याला रेल्वेकडून मोफत स्टॉल्स (Free Stalls) उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


750 स्थानकांवर योजना 


रेल्वेच्या या योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात 750 स्थानकांवर केल्या जाणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (South East Central Railway) नागपूर विभागातील 10 स्थानकांचाही यात समावेश आहे. जेथे 12 आधुनिक स्टॉल्स सुरू करण्यात येणार आहेत. विभागातील राजनांदगाव आणि इतवारी येथे 2-2 स्टॉल्स, तर गोंदिया, डोंगरगड, भंडारा रोड, तुमसर रोड, कामठी, छिंदवाडा, बालाघाट आणि नैनपूर येथे 1-1 स्टॉल्स उघडण्यात येणार आहेत. यानंतर या योजनेचा देशपातळीवर विस्तार करण्यात येईल.


वोकल फॉर लोकल


विशेषत: या योजनेद्वारे स्थानिक हस्तकला कलाकृती (Art), हातमाग (Handlooms), पारंपारिक कापड (Traditional textiles) आणि स्थानिक कृषी उत्पादने व खाद्यपदार्थ (local Agricultural Products) आदी उत्पादनांना रेल्वे स्थानकांवर प्रदर्शन आणि विक्री आउटलेट प्रदान करून प्रोत्साहन देत असल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रविश कुमार सिंह यांनी दिली.  केंद्र सरकारच्या 'वोकल फॉर लोकल' या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, समाजातील वंचित घटकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे विदर्भातील विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. तसेच स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी मिळतील.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur Crime : धावत्या रेल्वेतून सराफा व्यापाऱ्याचे 52 लाखांचे दागिने चोरी, अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील प्रकार


Engineering Admission : इंजीनिअरींगची प्रवेशप्रक्रिया लांबणार, 15 तारखेला सीईटीचा निकाल