नागपूर : नागपुरात (Nagpur) सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाचे पडसाद सोमवारी विधानसभेत देखील उमटताना दिसले. या स्फोटामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून या मृतांमध्ये 6 महिला व 3 पुरूषांचा समावेश आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या दुर्घटनेतील मृतकांच्या वारसांना प्रति कुटुंब 50 लाख रूपये मदत दिली जावी. तसेच या प्रकरणी कंपनी मालकावर भादंवि कलम 302 चा गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली आहे. 


कंपनीकडून कामगार वर्गाची पिळवणूक


नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे असलेल्या सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत रविवारच्या सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आत्ता पर्यंत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विषयी सभागृहात आणि सभागृह बाहेर देखील विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंपनीवर आरोप करत या विषयी सरकारने सखोल चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा. अशी मागणी केली. या विषयी बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, या आधी देखील सोलार इंडस्ट्रीज मध्ये अशा घटना घडल्या असून त्यात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. या कंपनीत 3 ते 4 हजार लोक काम करतात. यातील बहुतांश कामगार वर्ग हा माझ्या मतदारसंघातील आहे. या दुर्घटनेनंतर येथील कामगारांनी रोष व्यक्त करत या कंपनी विरोधात अनेक तक्रारी केल्या. रविवार सुटीच्या दिवशी देखील कामासाठी बळजबरी केली जाते. अन्यथा कामावरून काढून टाकले जाईल अशी धमकी दिली जाते. ऐकुणात या कंपनीकडून कामगार वर्गाची पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी सरकारने सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.  


नेमकं काय घडलं?  



नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी आणि गंभीर होती की, त्यामध्ये अनेज मजूर गंभीर जखमी झाले. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला. 


 


महत्त्वाच्या बातम्या: