Nagpur News : छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या सभेनंतर आज नागपूर शहरात (Nagpur City) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) 'वज्रमूठ सभा' होणार आहे. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र याच सभेत उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे प्रमुख आकर्षण ठरवण्याची शक्यता आहे. कारण या 'वज्रमुठ सभे'ला तेजस ठाकरेंची देखील उपस्थिती असण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नागपूरच्या दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची 'वज्रमूठ सभा' होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेनंतरची ही दुसरी सभा असणार आहे. सभेला होणारा विरोध पाहता सुरवातीपासून ही सभा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान पोलिसांनी देखील सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे या सभेला आता काही तास उरले आहे. दरम्यान त्यापूर्वीच अंबादास दानवे यांनी या सभेत तेजस ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत बोलताना दानवे म्हणाले की, “नागपूरच्या सभेला तेजस ठाकरे येण्याची शक्यता आहे. तेजस ठाकरे हे तरुणांसाठी प्रेरणादायी नाव आहे. त्यामुळे या सभेत त्यांनी यावे अशी देखील तरुणांची इच्छा आहे,” असे दानवे म्हणाले.
सभेला परवनागी मात्र 'या' आहेत अटी आणि शर्ती?
- नागपूरच्या दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर वज्रमूठ सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेणे बंधनकारक
- सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून "स्टेज स्टॅबिलीटी " प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे लागणार आहे.
- सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये, अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी आयोजकांची असणार आहे.
- सभेदरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नयेत.
- सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये.
- क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
- सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशनुसार आवाजाची मर्यादा असावी.
इतर महत्वाच्या बातम्या:
MVA Rally In Nagpur : नागपूरमधील सभेसाठी मैदानाच्या निवडीवरुन महाविकास आघाडीचे नियोजन फसले?