वर्धा : समृद्धी महामार्गावर  (Samrudhhi Highway Accident) गो तस्करीचं (Cow Smuggling) प्रकरण समोर आले आहे. वर्ध्यावरून एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.  पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यानंतर 50 पेक्षा जास्त गाई आढळल्या आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जात आहे का? असा प्रश्न  उपस्थित होत आहे. हिंगणामध्ये ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. 


समृद्धी महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना दिसून आला. त्यामुळे वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू करताच तो तो ट्रक आणखी जास्त वेगानेने पळू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला. त्याच वेळेस अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला. त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला.


अज्ञात गो तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल


 अनेक वाहन पाठलाग करत असताना  त्या ट्रकने नागपुर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले. हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिन्ही लोक पडून गेले. जेव्हा पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये 50 पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटी-वाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. अत्यंत दाटी-वाटीने बांधल्यामुळे त्यापैकी अनेक गाईंचा मृत्यू झालेला होता. तर अनेक गाई गंभीररीत्या जखमीही होत्या. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान गो तस्कर कत्तलखान्यात गो वंशीय प्राण्यांची ने आण करण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर करू लागले आहे का असा प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाला आहे. दरम्यान हिंगणामध्ये ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे... 


हे ही वाचा :


Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील सुशोभीकरण ठरतंय लक्षवेधी; अपघात रोखण्याच्या अनुषंगाने नवी शक्कल