नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे,आणि हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, काही लोकांना समजले आहे आणि काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ आहेत," असं त्यांनी म्हटलं. ते नागपुरात (Nagpur) एक वर्तमानपत्राच्या (तरुण भारत) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.


आरएसएस हे नक्कीच करेल, अशी हिंदू समाजाची भावना असल्याचं मोहन भागवत म्हणाले. "हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, हे सत्य आहे, आरएसएस हे नक्की करेल, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, यात काही आक्षेप नाही पण सर्व भारतीयांची काळजी करा, वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत," असं भागवत यांनी म्हटलं.


भारतातील प्रत्येकाचा हिंदू संस्कृतीशी संबंध : मोहन भागवत


मोहन भागवत पुढे म्हणाले की, "आज जे भारतात आहेत त्या प्रत्येकाचा संबंध हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमीशी आहे, इतर कोणाशी नाही, काही लोकांना हे समजलं आहे, काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ राहतात आणि काही लोकांना स्वार्थामुळे समजून घ्यायचं नाही. काही लोक हे विसरले आहेत, लोकांचा असा विश्वास आहे की आरएसएसला हिंदू आणि इतर सर्व गोष्टींची काळजी आहे."


राष्ट्र निर्माणासाठी मोहन भागवत यांनी मीडियाला पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी माध्यमांनी समाजाला तयार केले पाहिजे, असं भागवत यांनी म्हटलं.


मीडियाने चांगल्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात : फडणवीस


या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांनी म्हटलं की , जनमत तयार करण्यात मीडियाची मोठी भूमिका घेतली आहे. यासाठी म्हणूनच चांगल्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचं आहे. माध्यमांनी सामाजिक भान वाढवण्याचं चांगलं काम करायला पाहिजे.


सर्वसमावेशक विचारधारा ही वृत्तपत्रांची ओळख असायला हवी : गडकरी


कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नितीन गडकरी म्हणाले की, "वृत्तपत्रे विचाराच्या आधारावर चालली पाहिजेत. ध्येय निश्चित केल्यानंतर काम करणं महत्त्वाचं आहे. सर्वसमावेशक विचारधारा ही वृत्तपत्रांची ओळख असायला हवी. पण जनतेला तेच माध्यम आवडते, ज्याची एक ठराविक विचारधारा असते.


हेही वाचा


Mohan Bhagwat : जातीभेद नव्हता, असं समर्थन काही, लोकं करतात, पण असंं नाही