Nagpur : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्याने तयार करण्यात आलेले 'हनुमान कढई' ही जगातली सर्वात मोठी कढई ठरली आहे. त्यामुळे आधीच ‘विक्रमवीर’असलेल्या नागपूरचे प्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर (Vishnu Manohar) यांच्या नावे आणखी एक विश्व विक्रम प्रस्थापित झाला आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडियाने स्वयंस्फूर्तीने जगातील सर्वात मोठी कढईचा बहुमान देत विष्णू मनोहर यांना ‘रेकॉर्ड’ बहाल केला आहे.
‘जगातील सर्वात मोठी कढई’ म्हणून हा बहुमान
कोणताही विक्रम प्रस्थापित करायचा असल्यास त्यासाठी संबंधित संस्थेकडे प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर त्यांच्या अटी आणि नियमावलीनुसार विक्रम प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. मात्र श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे ‘जय हनुमान कढई’ ला वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडियाने स्वयंस्फूर्तीने ‘जगातील सर्वात मोठी कढई’ म्हणून हा बहुमान दिला आहे. दरम्यान, त्यासंदर्भातील प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडियाचे संयोजक संजय नार्वेकर आणि एडिटर सुषमा नार्वेकर यांच्या तर्फे विष्णू मनोहर यांना देण्यात आला आहे.
वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियामध्ये नोंद
प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या काही दिवसानंतर विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) तयार केला. यासाठी विष्णू मनोहर यांनी नागपुरातील विश्वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्स, एमआयडीसी, नागपूर येथून 15 हजार लिटर क्षमतेची आणि 1800 किलो वजन, 15 फूट त्रिज्या आणि 6 मीमी जाडीचा स्टीलचा पत्रा असलेली ही भली मोठी कढई तयार करून घेतली. या कढईचा आकारमान आणि भव्यता बघता या कढईला हनुमान कढई असे नाव देण्यात आले होते. कढईसाठी लोखंड, स्टील आणि तांबे या धातूंच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला होता.
विशेष म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियामध्ये या कढईच्या नावे विक्रम नोंदविण्यात आला आहे. या कढईची नागपुरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. हजारो रामभक्तांनी दर्शन घेतल्यानंतर 22 तारखेला एकीकडे अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना, इकडे श्री जगदंबा संस्थान कोराडी येथे 6 हजार किलोचा महाप्रसाद तयार करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. ही कढई आता अयोध्येकडे रवाना झालेली असून तेथील श्रीराम मंदिर न्यासला दान केली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune News: बागेश्वर बाबा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, रोहित पवारांची खोचक टीका