नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मनपा आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी मनपा मुख्यालयातील कार्यक्रमात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.


मनपाद्वारे मनपा शाळा विभाग, माध्यमिक विभाग आणि प्राथमिक विभागात ही स्पर्धा घेण्यात आली होती. मनपा विभागामध्ये केवळ मनपाच्याच शाळांचा सहभाग होता. इयत्ता 5 ते 8 आणि इयत्ता 9 ते 12 या दोन गटात निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. माध्यमिक आणि प्राथमिक विभागात शहरातील मनपाच्या आणि इतर शाळांचाही सहभाग होता. निबंध आणि चित्रकला स्पर्धा माध्यमिक विभागात इयत्ता 5 ते 8 आणि इयत्ता 9 ते 12 या दोन गटात घेण्यात आली तर प्राथमिक गटात इयत्ता 5 ते 8 या गटात घेण्यात आली. सर्व गटातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी 3000, 2000 आणि 1000 रुपये पुरस्कार देण्यात आले.


या विजेत्यांचा सत्कार


निबंध स्पर्धा : इयत्ता 5 ते 8 गट : उम्मे जैनब मो. शमीम अंसारी मेसूरी (जी.एम. बनातवाला उ.प्राथ. शाळा), रेहान कमलाकार गणवीर (दुर्गानगर मराठी.प्राथ. शाळा), प्रज्ञा ज्ञानेश्वर सपकाळ (प्रियदर्शनी म.उ.प्राथ. शाळा). 
इयत्ता 9 ते 12 गट : किर्ती मनोज लवनकर (दुर्गानगर मराठी उ. प्राथ. शाळा), जरिश्मा इकबाल अंसारी (एम.ए.के. आझाद माध्य. शाळा), सुहाना बानो मो. रईस शेख (कुंदनलाल गुप्ता उर्दू माध्य. शाळा).


चित्रकला स्पर्धा : इयत्ता 5 ते 8 गट : कमल रविंद्र भिसे (जयताळा हायस्कूल), आरूषी गणेश सोनवाने (दुर्गानगर मराठी माध्य. शाळा), अल्तमश अंसारी (बाजरी हिंदी उ.प्राथ. शाळा). इयत्ता 9 ते 12 गट : रश्मी अशक साहू (लालबहादुर शास्त्री माध्य. शाळा), आतेका खान (एम.ए.के. आझाद माध्य. शाळा), जगेश महेश धुर्वे (विवेकानंद नगर हिंदी माध्य. शाळा).


निबंध स्पर्धा : इयत्ता 8 ते 8 गट : खुशिता वसंता मोदेकर (श्रेयस हायस्कुल), आरजु मनोहर सहारे (दादासाहेब धनवटे विद्यालय), खुशी बळीराम चांदेवार (सोमलवार हायस्कुल, रामदासपेठ). इयत्ता 09 ते 12 गट : गुलफिरोजी नाज पठाण (बिंझाणी महिला महाविद्यालय), रेणुका जी पूरी (दयानंद आर्य कन्या विद्यालय) करण पतिराम सिन्हा (नित्यानंद विद्यालय). 
चित्रकला स्पर्धा : इयत्ता 5 ते 8 गट : जिज्ञासा शेंडे (दयानंद आर्य कन्या विद्यालय), हिरण्य मेश्राम (सेंट जॉन स्कूल), नयन कुरंजकर (पंडीत बच्छराज व्यास विद्यालय). इयत्ता 9 ते 12 गट : प्रिन्स गुप्ता (के.टी. रुग्वानी हायस्कूल), अनन्या द्विवेदी (ओंकरलाल सिंधु हायस्कुल), शिवम बारापात्रे (गायत्री कॉन्व्हेंट). 


निबंध स्पर्धा : इयत्ता 5 ते 8 गट : श्रेया शेडमाके (रानु हॉपर प्रा. शाळा, मानकापूर), श्रेया साखरे (यशोदा उच्च प्राथ. शाळा, यशोदानगर), मुस्कान रहोम शेख (प्रियदर्शनी विद्यानिकेतन शाळा सेमिनरी हिल्स)
चित्रकला स्पर्धा : इयत्ता 05 ते 08 गट : प्रथमेश बिसने (दिपंकर उ.प्रा. शाळा), स्वराज बांगरे (तेजस्विनी विद्यामंदीर), अर्णव मेश्राम (दिव्यांग) (ज्योती उ.प्रा. शाळा).


यायावेळी स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, मिलिंद मेश्राम, विजय हुमने, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, अशोक पाटील, डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक आयुक्त किरण बगडे, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता अजय मानकर, गिरीश वासनिक आदी उपस्थित होते.


RTMNU Exams : अतिवृष्टीमुळे पुन्हा आज आणि उद्याच्या नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द, 'या' हेल्पलाईन क्रमांकावर साधा संपर्क


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI