नागपूर : नागपुरात एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे गँगरेप प्रकरणातील चारही आरोपी नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस' (स्टार बस) सेवेचे कंडक्टर आहेत.
16 वर्षांची पीडित तरुणी घरापासून महाविद्यालयात जाण्यासाठी महापालिकेच्या आपली बस सेवेचा वापर करायची. बसमध्ये नेहमी प्रवास करत असल्यामुळे तिची 22 वर्षीय धर्मपाल मेश्राम या कंडक्टरसोबत ओळख झाली होती. धर्मपालने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचं आमिष दाखवलं.
जुलै 2018 मध्ये नागपुरातील मानकापूर परिसरातील 'पूजा रेसिडेन्सी' या इमारतीत धर्मपालने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर धर्मपालने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर तीन मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचा दावा केला जात आहे.
उमेश मेश्राम, आशिष लोखंडे आणि शैलेश उर्फ अजय वंजारी नावाच्या आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. चार आरोपींनी ऑक्टोबर महिन्यात दोन वेळा तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं पीडितेने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केलं आहे. शिवाय एकदा अनैसर्गिक कृत्य केल्याचा दावाही तिने पोलिसांकडे केला आहे.
आरोपींचा वाढता त्रास आणि त्यांच्याकडून सातत्याने बदनामीची दिली जाणारी धमकी या कारणामुळे नुकताच पीडितेने रेल्वेने नागपुरातून पळ काढला होता. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ती रेल्वे पोलिसांच्या हाती सापडली. त्यानंतर तिने आपली व्यथा तिथल्या 'चाईल्ड लाईन' या अल्पवयीन मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेपुढे मांडली.
रायपूर रेल्वे पोलिसांनी नागपूर पोलिसांकडे या प्रकरणाची सर्व माहिती दिली. नागपूर पोलिसांनी काल या प्रकरणात पीडितेचं म्हणणं नोंदवून घेत चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आणि चौघांनाही अटक केली. पीडितेच्या शोषणामागे एखाद्या मोबाईल चित्रीकरणाचा किंवा क्लिपिंगचा वापर आरोपींनी केला आहे का, याचा शोधही पोलीस घेत आहेत.
नागपुरात अल्पवयीन विद्यार्थिनीवर गँगरेप, 'आपली बस'चे चार कंडक्टर अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2019 08:26 AM (IST)
जुलै 2018 मध्ये नागपुरातील मानकापूर परिसरातील 'पूजा रेसिडेन्सी' या इमारतीत धर्मपालने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर धर्मपालने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर तीन मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचा दावा केला जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -