नागपूर : पुणे जिल्ह्यात घडलेल्या हीट अँड रन (Hit and Run) प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला होता, त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात हीट अँड रन व अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच, आज नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर छिंदवाडा महामार्गावर हिट अँड रनची भीषण घटना घडली. या अपघातात दुचाकीवरुन तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची (Accident) घटना घडताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करण्यात आले.  


चारचाकी आणि दुचाकी वाहनाचा हा अपघातात झाला असून दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा जागची मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला. नागपूर-छिंदवाडा महामार्गावर दुपारी 12 वाजताच्या सुमारासची घटना या अपघातानंतर स्थानिकांकडून माहिती मिळताच केळवद पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करत आहेत. 


हेही वाचा


श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले