सावनेर : सावनेरमध्ये महिला कबड्डीपटूने आत्महत्या (Nagpur Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. कीटकनाशक प्राशन करून महिला कबड्डीपटूने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. आपली आर्थिक अडचणीत सुटका व्हावी म्हणून नोकरी मिळवून देण्याच आमिष आणि लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे कबड्डीपटूने टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.(Nagpur Crime News)

Continues below advertisement

Nagpur Crime News:  तरूणाने मानसिक त्रास द्यायला सुरूवात

घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, शिक्षण घेऊनही हाताला काम मिळत नव्हतं, त्यातच एका तरुणाने तिला नोकरी मिळवून देण्यासाठी लग्न करण्याचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. नोकरी मिळेल या आशेने महिला कबड्डीपटूने त्या तरूणाशी लग्न तर केलं, मात्र काही दिवसांनी आपण लग्न करून फसल्याचे तिच्या लक्षात यायलं लागलं. त्यातच त्या तरूणाने मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली. हा मनस्ताप असह्य होऊ लागल्याने तिने अखेर कीटकनाशक पिऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे रविवारी (दि. ७) घडली आहे.(Nagpur Crime News)

Nagpur Crime News: सैन्य दलासोबत पोलिस, होमगार्ड, डिफेन्ससह अन्य विभागांत नोकरीसाठी प्रयत्न 

मृत महिला कबड्डीपटूचे नाव किरण सूरज दाढे (वय २९, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) असे आहे, तर स्वप्निल जयदेव लांबघरे (३०, रा. पटकाखेडी, ता. सावनेर) असे याप्रकरणातील फरार आरोपीचं नाव आहे. किरणने सावनेर शहरातील डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयात बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. विद्यार्थिदशेत तिने विद्यापीठासोबत राज्य व राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवलं. उत्कृष्ट कबड्डीपटू असल्याने आपल्याला नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असल्याने तिने सैन्य दलासोबत पोलिस, होमगार्ड, डिफेन्ससह अन्य विभागांत नोकरीसाठी प्रयत्न केले होते. 

Continues below advertisement

Nagpur Crime News: मोबाइलवर आलेले सगळे मेसेज सेव्ह करून ठेवले अन्...

नोकरी मिळण्यात यश येत नव्हतं, त्यातच घरात आर्थिक परिस्थिती बेताची होती, त्यामुळे तिने सावनेरातील डॉ. अनुज जैन यांच्या डेंटल क्लिनिकमध्ये कामाला लागली, पुढे त्या तरूणाचा त्रास वाढल्याने तिने त्याचे मोबाइलवर आलेले सगळे मेसेज सेव्ह करून ठेवत गुरुवारी (दि. ४) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक घेतलं. कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. प्रथमोपचार केल्यानंतर तिला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Nagpur Crime News: संबंध ठेवण्यासाठी दबाव

लग्नानंतर स्वप्निल तिला व तिच्या भावाला नोकरी लावून देण्यास टाळाटाळ करत होता. त्याचबरोबर संबंध ठेवण्यासाठी देखील तो दबाव टाकत होता. संबंधासाठी नकार दिल्यास घटस्फोटाची धमकीही त्याने दिली होती. तिला अडवून तो त्रास द्यायचा, फोनवर शिवीगाळ करायचा, त्यानंतर तिने घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात प्रकरण दाखल केलं. तरीही त्याचा त्रास कमी झाला नाही.