Jungle Satyagraha : सरसंघचालक आणि संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील करडगावच्या घाट परिसरात 91 वर्षांपूर्वी जंगल सत्याग्रह केला होता. त्याच सत्याग्रहाच्या ठिकाणी एक भव्य संग्रहालय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तर्फे येत्या काही दिवसात तयार करण्यात येणार आहे. डॉ. हेडगेवार यांच्या जीवकार्यावरील सर्व बाबी येथे राहणार आहेत. पुस्तकालय आणि विविध आंदोलनाचे वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प संग्रहालयात राहणार आहे. त्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. 


संग्रहालय यवतमाळच्या करडगाव घाटात उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश प्रकल्प सल्लागार आशीष कुमार यांनी दिले आहे.  विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशात साजरा केला जातो, त्याअंतर्गत आजादी का अमृत महोत्सवांतर्गत देशभरात विविध कार्यक्रम होत आहे. त्याच स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा दांडीयात्रा होती, मिठाचा सत्याग्रह चे विदर्भात स्वरूप म्हणजे जंगल सत्याग्रह आहे.  त्याच जंगल सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभागी झालेले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांनी 21 जुलै 1930 रोजी 10 हजार लोकांसह येथे जंगल सत्याग्रह केला होता. त्याच स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा भाग म्हणून डॉ हेडगेवार यांना आदरांजली म्हणून येथे भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहेत .


यवतमाळ येथील दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेने राज्यसभेचे खासदार डॉक्टर राकेश सिन्हा यवतमाळ मध्ये आले असता या जंगल सत्याग्रह बाबत संग्रहालय व्हावे असा विचार मांडला होता.  त्यानंतर राज्यसभेचे खासदार डॉक्टर राकेश सिन्हा डॉ. हेडगेवार यांच्यावर संशोधित चरित्र लिहिले.   या सत्याग्रह बाबत माहिती होतीच आणि त्यानी राज्यसभेत 11 फेब्रुवारी 2021 रोजी प्रश्न सुद्धा उपस्थित केला. या ठिकाणी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकार्य आणि जंगल सत्याग्रह निमित्त संग्रहालय उभारण्याची मागणी सरकारला केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तर्फे याच ठिकाणी भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे, तसे पत्र दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेला प्राप्त झाले आहे.


स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात इंग्रजांविरोधात आंदोलन सुरू होते, त्याच वेळी 1930 च्या काळात त्यावेळी विदर्भ आणि मध्यप्रांत जंगल सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. विदर्भ आणि मध्यप्रांत मिठागरे नसल्याने जंगल सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यावेळेस लोकनायक बापूजी यांनी जिल्ह्याच्या पुसद परिसरातिल धुंदी जंगलामध्ये जंगल सत्याग्रहाची चळवळ उभी केली. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळच्या करडगाव घाटामध्ये 21 जुलै 1930 रोजी जंगल सत्याग्रह केला होता.
 
यवतमाळच्या धामणगाव रस्त्यावरील धरणगावच्या घाटामध्ये जंगल सत्याग्रह झाला होता, त्यावेळेस डॉक्टर हेडगेवार यांच्या सोबत दहा हजार नागरिकांनी जंगल सत्याग्रह केला होता. त्या वेळेस 11 व्यक्तींना डॉक्टर हेडगेवार यांसोबत अटक करण्यात आली होती, त्यांना यवतमाळच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं.  त्यांना कारावासाची शिक्षा झाली होती, या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सर्वाना कळावं यासाठी येथे संग्रहालयात उभं राहतेय, अशी माहिती दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी दिली.