Winter Session: राज्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (11 डिसेंबर) विधानभवनामध्ये अतिवृष्टीवर चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेमध्ये थेट मंत्र्यांनीच दांडी मारल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सडकून प्रहार केला. जाधव यांनी सलग दुसऱ्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांची उपस्थिती कामकाजामध्ये दिसून येत नसल्याने सत्ताधारी भाजप आमदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली.  भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवर महायुती सरकारवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले, ''एनडीआरएफचे निकष तुम्ही वाढवले आहेत का? कापूस, संत्री, कांदा असेल यांचं वाटोळं झालं आहे. कोकणामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे." ते पुढे म्हणाले की "बिहारमध्ये कोणी मदत मागितली होती का? मग इथं कशाला प्रस्ताव मागता?" अशी सवाल भास्कर जाधव यांनी केला. 

Continues below advertisement

केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री?

जाधव यांनी केंद्रीय पथकावरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का?" अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली. पुरवणी मागण्यांवरूनही भास्कर जाधव यांनी सरकारवर सडकून प्रहार केला. "75000 कोटींच्या पुरवण्यात मांडल्या गेल्या, याचा अर्थ तुमचे बजेट पुरतं कोलमंडलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय मदत करणार आहात?" अशी विचारणा त्यांनी केली. राज्याची आर्थिक स्थित बिघडली असल्याचे पुन्हा  सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. 

पुन्हा असे पॅकेज देऊ नका

शेतकऱ्यांना तीन ते चार हेडखाली मदत दिली आहे, त्याला पॅकेज दिले म्हणतात. हे फसवं पॅकेज असल्याचे टीका त्यांनी केली. ते म्हणाले, "पुन्हा असे पॅकेज देऊ नका, शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. 32 हजार कोटींचे पॅकेज दिले असे बोलतात, तर ते सभागृहामध्ये सांगा. शेतकरी कसा उभा राहणार? पूर्वीची व्यवसाय कसे चालणार आहेत? महागाई वाढली असून पिकाचा दर मात्र खाली आला आहे. पुरामुळे तो पुरता उद्ध्वस्त झाला आहे. ही मदत त्याला कशी मिळणार?" अशी विचारणा जाधव यांनी केली.  घोषणा केल्या पण ही पॅकेज फसवी असतात हे सभागृहामध्ये सिद्ध झाल्याचं जाधव म्हणाले. अतिवृष्टी झाल्याने नद्यांनी जमीन खरडून काढली. अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे एका सीजनपुरती मदत करून चालणार नाही. सर्वांचा एकत्र अनुभव करून ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ही चर्चा फक्त किंवा भाषणांपुरती नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या