नागपूर: आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.पुन्हा एकदा  अवकाळी पावसाने विदर्भासह (Vidharbha) राज्यातील अनेक भागांत अवकृपा केली आहे. त्यामुळे अवेळी पडलेल्या या पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. विदर्भातील बहुतांश भागात हाता तोंडाशी आलेल्या शेतमालचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विशेषता विदर्भातील हरभरा, तूर, सोयाबीन,कापूस, गहू इत्यादी पिकांना मोठा फटका बसला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Centre) विदर्भात पुढील दोन दिवस येलो अलर्ट दिला असल्याने शेतकऱ्यांवरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घ्यावी अश्या सूचना देखील हवामान विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहे. 


हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे निकसान


अवकाळीने विदर्भातील (Vidharbha) बहुतांश जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपुन काढले असताना थंडीने देखील जोर धरला आहे.विदर्भातील चंद्रपूरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काल रात्री अचानक आलेल्या पावसाने जिल्ह्यातील बळीराजावर मोठं संकट ओढवले आहे. वेचणीला आलेला कापूस, कापणीवर आलेला धान आणि फुलावर असलेल्या तूर या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तनविण्यात येत आहे.तसेच रब्बीच्या चना आणि गहू पिकाला देखील या नुकसानीची झळ पोहचणार शक्यता आहे.बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी दमदार पाऊसासह काही भागात गारपीटेने शेतकऱ्यांचे कंबरडं मोडले आहे. जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होते, तर रात्रीच्या सुमारास मेघ गर्जना, विजेच्या कडकडाटसह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात तुफान गारांचा देखील पाऊस झाला आहे. सिंदखेडराजा व लोणार तालुक्यात रात्री झालेलेल्या गारांमुळे शेतातील हरबरा गहू मिरची पिकांच मोठ नुकसान झाले आहे.असं असतांना जिल्ह्यातील रब्बी पिकांना कुठे दिलासा,तर कुठे पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे. 


 अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल 


विदर्भात शेतातील कापूस पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे,तर काही शेतकाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.दमदार पावसाने शेतीतील नेटशेड चे मोठे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश भागात शेतीतील नेटशेड कोसळले आहेत. त्यामुके शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरु असून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. अचानक बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम झाला असल्याने सर्दी ताप यासारख्या आजाराने नागरिक हैरान झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या रात्रीच्या पावसामुळे चांगलेचं संकटात सापडले आहेत. कारण वेसनीला आलेला कापूस या पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे सुरुवातीपासूनच पाऊस काळ कमी कमी होता पावसाने मारलेली दांडी या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जोपासली होती. परंतु रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. 


शेतमालासह वन्यजीवांना देखील अवकाळीचा फटका


काल रात्रीपासून सर्वत्र पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकरी, नागरिकांसह वन्यजीवांना देखील बसला आहे.वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील चिस्ताळा या गावालगत असलेल्या एका झाडावर शेकडो बगळी आश्रय घेत होते. मात्र काल रात्री झालेल्या दमादर पाऊस आणि गारपिटेने या बगळ्यांचा नाहक बळी गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अवकाळी मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकटामुळे जवळपास शंभर ते दीडशे बगळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे किंवा वीज पडल्यामुळे बगळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात


 आवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने खराब होण्याची शक्यता आहे. पावसात भिजल्याने 30 टक्के मिरची खराब होण्याचा अंदाज आहे. दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


 


ही बातमी वाचा: 


Unseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान