नागपूर : आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभीषिका प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन 17 तारखेपर्यंत खुले असून नागरिकांनी कुटुंबासह भेट द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  या प्रदर्शनात भारत पाकिस्तान फाळणीचे सचित्र दर्शन नागरिकांना होणार आहे.


धार्मिक फाळणीबद्दलही...


धार्मिक आधारावर लार्ड मॉउंडबेटन यांनी केलेल्या फाळणीमुळे जीवनशैली, अस्तित्व यामध्ये अचानक कसे बदल झाले. मानसिकता नसतांना ही फाळणी लादल्या गेली. त्यावेळची नेमकी स्थिती काय होती. 2 जून 1947 प्रत्यक्षात फाळणीला मंजूरी देण्यात आली, या फाळणीमुळे  लोकांच्या मनात भिती व हिंसा यांची एकत्र स्थिती उद्भवली होती, फाळणीमुळे झालेल्या ऐतिहासिक बैठका,याची प्रचिती या प्रदर्शनामुळे आपणाला कळणार आहे. ही माहिती बघणे अंगावर काटा आणते. त्यामुळे हा ऐतिहासिक ऐवज बघण्यासाठी आपल्या मुलांसह कुटुंबाने यावे असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.


अनेक घटनांची आठवण


या फाळणीच्या वेळी भारतातून 65 लाख लोक पाकिस्थानात गेले व पाकिस्थानातून 60 लाख भारतात आले. त्यांच्या वेदना व दु:ख या या व्यतिरिक्त अनेक घटनांच्या आठवणी या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे. हे प्रदर्शन 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी नि:शुल्क आहे, प्रदर्शनाला नागरिकांनी एकदा आवश्य भेट दयावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याठिकाणी प्रांरभी जिल्हा माहिती कार्यालयाने दुर्मिळ लोकराज्याचे प्रदर्शन लावले आहे, सोबत स्वराज्य मोहत्सवांतर्गत नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे.


Azadi Ka Amrit Mahotsav : नागरिक अन् पोलिसांमधील संवाद वाढविण्यासाठी माहितीचे प्रदर्शन आवश्यक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मतदार कार्डला आधार जोडणीही


निवडणूक विभागातर्फे मतदार कार्डला आधार जोडणी करण्याचा स्टॉलही याठिकाणी आहे. येथे प्रेक्षकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीला बघता येणार आहे. त्यामुळे कुटूंब कबिलासह याठिकाणी आवार्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आज उपमुख्यमंत्र्यांसोबत विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्न बी., मनरेगा आयुक्त शांतनु गोयल, जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


Independence Day 2022 : 76 व्या स्वातंत्र्य दिनाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी, वाचा सविस्तर...


ndependence Day 2022 : 76 व्या स्वातंत्र्य दिनाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी, वाचा सविस्तर...