Bacchu Kadu On Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आधी दिली नसावी, त्यांना आयत्यावेळी सांगण्यात आलं असावं, त्यामुळे आमच्या शपथविधीचा विचार झाला नाही, असा धक्कादायक दावा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या कार्यशैलीला नाराज होऊन शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते, त्यातच बच्चू कडू यांचाही समावेश होता. बच्चू कडू यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारसह अजित पवार अर्थमंत्री हवे की नको याबाबत संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी अनेक मोठे दावे केले आहेत.
जे 20 वर्षांत शिकलो नाही ते पाच वर्षांत शिकलो
"सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असं बोललं जात आहे. सध्या हा मोठा पेच आहे. राष्ट्रवादीच आता भाजपसोबत आहे. राजकारणात जे 20 वर्षांत शिकलो नाही ते पाच वर्षांत शिकलो. राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण आता करावं लागलं, वरुन आदेश असतील. लोकसभा जिंकायची असेल. लोक विजयाकडे, संख्येकडे जातात आणि विचारांना मागे टाकावं लागतं. इच्छा नसताना सुद्धा करावं लागतं. तसा हा प्रकार आहे," असं अजित पवार म्हणाले.
आमच्या गटातील आमदारांना अजित पवार हे अर्थमंत्री नको आहेत, त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना निधीची पळवापळव केली म्हणून आम्ही इकडे आलो होता, असं सेनेच्या आमदारांचं मत आहे. ते मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला सोयरसुतक नाही. आम्हाला स्वत:चं अस्तित्त्व आहे. आमच्या मतदारसंघात अजित पवार यांची बिलकुल ढळाढवळ आम्ही बिलकुल सहन करणार नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार झाला पण तिसऱ्या नंबरवर येणाऱ्यांचा
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू म्हणाले की, "राजकारणाला मर्यादा असणं गरजेचं आहे. एक वर्षापासून मंत्रिमंडळ विस्तार होणार असं सांगितलं जात होतं. विस्तार झाला पण तिसऱ्या नंबरवर येणाऱ्यांचा म्हणजेच राष्ट्रवादीचा झाला आणि जुने राहू दिले. पहिल्याला डोक्यावर घेतलं त्याला खाली टाकलं, दुसऱ्याला डोक्यावर घेतलं त्याला खाली टाकलं, असा प्रकार थांबायला हवा. आम्ही विस्तार करु शकत नाही, असं स्पष्ट सांगावं जेणेकरुन आमदारांच्या डोक्यातून ही गोष्ट जाईल. पण तेच तेच डोक्यात राहिलं तर चीड निर्माण होते, जे साहजिकच आहे."
मुख्यमंत्र्यांनाही कदाचित कल्पना दिली नसावी
बच्चू कडू म्हणाले, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विस्तार करताना मुख्यमंत्र्यांना तरी कल्पना दिली की नाही हे माहिती. कदाचित त्यांनाही कल्पना दिली नसावी. त्यांना माहिती दिली नसावी. हे कदाचित नीती असावी, खेळी असावी. हे सगळं घेताना जुन्याचं विचार करावा असं माझं मत आहे
VIDEO : Bacchu kadu : तीन इंजिनचे सरकार आहे हे मजबूत पण राहू शकते व कधीही कोसळू शकते
हेही वाचा
राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही, अतिरेकानंतर स्फोट होईल, बच्चू कडूंची खदखद बाहेर