नागपूर:  नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) सोन्याची तस्करी करण्याचा प्रकार समोर आला आहे. कस्टम विभागानं नागपूर विमानतळावर कतारवरुन आलेल्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 87 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत.


 कस्टम्स विभागातील अधिकाऱ्यांना दोघेजण सोन्याची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मंगळवारी पहाटे कतर मधून आलेल्या विमानातून ते नागपूर विमानतळावर दाखल झाले होते.  त्या आधारे दोघांची तपासणी केली असता दोघांनी शरीरावर घातलेल्या कपड्यात पावणे दोन किलो सोनं पेस्ट स्वरूपामध्ये लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.  कस्टम्स विभागाचे अधिकारी दोघांच्या सीडीआरची तपासणी करत असून त्याद्वारे पुढील लिंक्स उघडकीस येण्याची शक्यता आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी कोठून  होत होती याचा तपास सुरू आहे


पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा?


काहीच दिवसांपूर्वी दुबईहून स्पाईसजेट फ्लाईटने पुण्यात आलेल्या  एका महिला प्रवाशाकडून 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले होते. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या होत्या त्यामुळे य़ा महिलेची कसून तपासणी करण्यात आली होती. 


मागील काही दिवसांपासून कस्टम विभागाने धडाधड कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुण्यात 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. अंमली पदार्थ विरोधी आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. पुणे पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्त कारवाई करतात.


ही बातमी वाचा: