Maharashtra Assembly Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात (Winter Assembly Session) आलेल्या आमदारांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार परवा (21 डिसेंबर) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्हिडीओ उजेडात आला होता, त्यानंतर काल तो मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला.


काल उघडकीस आलेल्या या प्रकरणावरुन तरी खानपानाच्या व्यवस्थेच्या स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. पण आज सकाळी विधानभवन इमारत परिसरात असलेल्या शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संत्र्याची साल काढताना, इतर फळे धुताना आणि ज्यूससाठी कापताना आढळले. त्यामुळे अधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 


विधान परिषद (Vidhan Parishad) इमारतीच्या अगदी समोर असलेल्या ज्या शीतल ज्यूस सेंटरमध्ये हा प्रकार उघडकीस आला, त्या ज्यूस सेंटरमधून मंत्री, आमदार, सर्व अधिकारी यांना ज्यूस दिला जातो आणि येथे कामासाठी आलेले हजारो लोक ज्यूस पितात. विदर्भाच्या बाहेरुन आलेले लोक तर हमखास संत्र्याच्या ज्यूसचा आस्वाद येथे घेतात. पण आज हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गेले चार दिवस येथे जे ज्यूस प्यायले, त्यांना उलटी होणेच, तेवढे बाकी राहिले होते. 


म्हणे फळांच्या स्वच्छतेसाठी दिली नाही जागा...


शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या (Toilet) बाहेर संत्र्याची सालं आणि फळे धुताना आणि कापताना आढळल्यानंतर त्यांना विचारणा केली. तेव्हा येथे जागाच नसल्यामुळे शौचालयाच्या बाहेर लागूनच असलेल्या जागेत हे काम करावे लागते, असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले.  


सभागृहात गाजणार का मुद्दा?


शौचालयात ताटं आणि कपबशा धुतल्याचा मुद्दा काल आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संबंधित दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आज शीतल ज्यूस सेंटरचा मुद्दादेखील सभागृहात तापण्याची शक्यता आहे. कारण हा कुण्या एका-दोघांचा नाही, तर हज्जारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने एक विशेष पथक तयार करुन या गोष्टींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.


ही बातमी देखील वाचा


'कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय'; कर्नाटक, शिंदे सरकारविरोधात मविआ आमदारांच्या घोषणा