Nagpur ST Bus : साई भक्तांसाठी एसटी महामंडळाची भेट; समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी 'नॉनस्टॉप' बससेवा, 'या' सवलतीही मिळणार

एबीपी माझा वेब टीम Updated at: 12 Dec 2022 07:21 PM (IST)
Edited By: अक्षय गांधी

या विशेष बस सेवेत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत लागू असणार आहे. तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतही लागू राहणार आहे.

file photo

NEXT PREV

Nagpur News : कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी (nagpur to Shirdi) या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यानंतर आता एसटी महामंडळाकडून नागपूर ते शिर्डी बस सेवेची सुरुवात येत्या गुरुवार(15 डिसेंबरपासून) करण्यात येत आहे. ही बस नॉनस्टॉप राहणार असून दररोज ही गणेशपेठ येथील बसस्थानकावरुन निघेल. याआधी नागपूर ते शिर्डी थेट बससेवा नव्हती.


नागपूर ते शिर्डी (Nagpur To Shirdi) दरम्यान एसटीची विना वातानुकूलित आसन ( सीटिंग) दररोज नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरुन रात्री नऊ वाजता निघेल. तसेच सकाळी साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचेल. तसेच शिर्डी येथून महामंडळाची बस रात्री नऊ वाजता निघून सकाळी 5.30 वाजता पोहोचेल. नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी प्रवाशांना 1300 रुपये भाडे राहील.


75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास


या विशेष बस सेवेत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास (Free travel discount) सवलत लागू असणार आहे. तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतही लागू राहील.


गरज पडल्यास आणखी बस फेऱ्या वाढवणार


सध्य दररोज फक्त एक बस नागपूर ते शिर्डीसाठी नियोजित करण्यात आली आहे. तसेच भविष्यात भाविकांची मागणी असल्यास विकेंडमध्ये बसेसची संख्या वाढविण्याचाही विचार करण्यात येईल. तसेच नागपूर ते शिर्डी आतापर्यंत थेट बससेवा नसल्याने आतापर्यंत नागरिकांना कोपरगाव किंवा मनमाड येथून दुसरी बस घ्यावी लागत होती. मात्र या नव्या  एसटीची विनावातानुकूलित (Air Conditioner) बसमुळे नागरिकांना थेट शिर्डी पोहोचता येणार आहे.


रेल्वेचीही कनेक्टिव्हीटी निवडक


नागपूर ते शिर्डीसाठी 20857 आणि 22894 या दोन थेट गाड्या आहेत. तर इतर गाड्यांनी मनमान, कोपरगाव किंवा लासालगाव येथे उतरावे लागत होते. तसेच नागपूर ते थेट शिर्डीसाठी रेल्वेने सुमारे 11 तासांचा वेळ लागत होता. मात्र या समृद्धी महामार्गावरील नव्या बसमुळे साडे आठ तासांत शिर्डी पोहोचता येणार आहे.



सध्या नागपूर ते शिर्डी दिवसभरात एकच बसची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांचा प्रतिसाद आणि मागणी बघता बसची संख्या वाढविण्याचा विचार करण्यात येईल. - श्रीकांत गभने, एसटीचे विभाग नियंत्रक


ही बातमी देखील वाचा


Holidays 2023 : नवीन वर्षात 24 सुट्ट्यांची मेजवानी; सर्वाधिक सहा सुट्ट्या मंगळवारी

Published at: 12 Dec 2022 07:19 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.