नागपूरः हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील कैद्यांचा पाण्याचा टाक्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने नागपूर मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली. तो 15 वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. ही बाब उघडकीस येपर्यंत बराच उशीर झाला होता. 36 वर्षीय मंगेश अनिल हिरकणे असे मृतक कैद्याचे नाव असून मागील 15 वर्षांपासून तो हत्येच्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
मृतक मंगेश हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील कंटजीचा (काळा) रहवासी होता. 2007 मध्ये हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेप सुनवल्याने शिक्षा भोगत होता. कारागृहातील प्रत्येक बराकीत स्वच्छतागृह आहे. तसेच त्याच्या बाजूला पाण्याचे टाकी आहे. कारागृहाच्या आत कैद्याच्या बराकी बाहेर स्वच्छतागृहाच्या पाण्याच्या टाक्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतक मंगेश हा पाण्याच्या टाक्यात जाऊन बसला. बराच वेळ होऊन बराकीत परत न आल्याने देखरेख करणाऱ्या कारागृह प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांने पाण्याच्या टाक्याकडे जाऊन पाहिले. त्यावेळी मंगेश हा बेशुद्धावस्थेत दिसून आला. यावेळी त्याला तात्काळ नागपूरच्या मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले.
आत्महत्या की अपघात?
धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. या प्रकरणात आता मंगेश हिरकणेचा मृत्यू हा आत्महत्या केल्याने झाला की अन्य काही कारणाने झाला याचा शोध पोलीस घेत आहे. कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार त्याला मिर्गीचा त्रास होता. तो नेहमी स्वतःचा आपल्या गुंत्यात राहत होता, स्वतःशीच बोलत असायचा.
इतर महत्वाच्या बातम्या