नागपूर : नागपुरात नितीन गडकरींवर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. काँग्रेस पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात   मुत्तेमवार यांनी गडकरी यांच्यासंदर्भात अपशब्द वापरत त्यांना 'भ्रष्टाचाराचा सांड' असे संबोधले आहे. नागपुरात गडकरींचा मुकाबला आता कुणीच करू शकत नाही. कारण गडकरी हे 'भ्रष्टाचाराचा सांड' आहेत, असे मुत्तेमवार म्हणाले.


WATCH : विलास मुत्तेमवारांचं मोदींच्या आई-वडिलांबाबत वादग्रस्त विधान | जयपूर | एबीपी माझा


आता नागपूरची निवडणूक पैशेवाल्यांची झाली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनो जरी नाना पटोले यांचे लिफाफे तुमच्या पर्यंत पोहोचले नाही, तरी तुम्ही काँग्रेसचेच कार्य करा, असे आवाहन मुत्तेमवारांनी केले. नागपुरात आता खासदार बदलायचा आहे. आमदार बदलायचा आहे. सत्ता बदलायची आहे, असेही मुत्तेमवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, नाना पटोले यांनी खासदारकीची दोन वर्ष शिल्लक असताना त्यांचे पद सोडले. त्यामुळे अशा प्रामाणिक माणसाला डोक्यावर घ्यायचं की भ्रष्टाचाराचा डमरु वाजवणाऱ्या भाजपवाल्यांना डोक्यावर घ्यायचं? असा सवालही मुत्तेमवार यांनी केला.

नुकतेच मुत्तेमवार यांनी गडकरी नेहमी दावा करतात की 'ते मर्द का बच्चा' आहेत. आम्ही कधीचा त्यांच्या या दाव्यावर शंका घेतली नाही की ते मर्द का बच्चा नाहीत. मात्र, आता जर गडकरी खरोखर मर्द आहेत तर त्यांनी आश्वासन दिले 50 हजार रोजगार कुठे आहेत? असे वक्तव्य केले होते.