नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रविण दटके यांच्यावर निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यापाठोपाठ आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधातही निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागपूरमधील दीपक मेहता यांनी ही तक्रार दाखल केली आहे.


दीपक मेहता यांनी विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात निवडणूक आयोग, पोलीस, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष अशा अनेकांकडे तक्रार केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आर्थिक माहिती योग्य दिली नाही असा दावा केला आहे.


दीपक मेहता यांचे आरोप काय आहेत?




  • शिवानी इन्फ्रा ही कंपनी बंद झाली असून तिथून स्वतः व पत्नीच्या नावे कर्ज दाखवले असल्याचा आरोप.

  • देवयानी लॉजिस्टिक्स या कंपनीत वडेट्टीवार आणि पत्नी सक्रिय पार्टनर्स असून ती माहिती लपवल्याचा आरोप.

  • वर्धान सुपर स्पेशालिटी दवाखान्याला कर्ज दिल्याची माहिती लपवल्याचा आरोप.


एकीकडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची मुदत संपली असल्याचे कळते आहे. मात्र इतरही अनेक ठिकाणी दीपक मेहता यांनी तक्रार केली आहे. मात्र गेल्या काही वर्षांच्या निवडणूक आयोगाच्याच निर्देशाप्रमाणे ही तक्रार कोर्टात नेऊन त्यावर कारवाई होऊ शकते.


Vijay Vadettiwar | विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा नागपूरवासियाचा आरोप