नागपूरः मोमीनपुरा (Mominpura) येथील एमएल कँटीनच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण झाल्याने मनपाच्या (NMC) अतिक्रमण विभागाने बुलडोझरद्वारे कारवाई करून जागा मोकळी केली. मुस्लिम लायब्ररीला (Muslim Library) ही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. एमएल कँटीनच्या बेकायदेशीर कारभारावर प्रदीर्घ वादानंतर 19 मे रोजी कँटीनचे संपूर्ण अवैध बांधकाम हटविण्यात आले होते. मनपाने कारवाई करून जागा पूर्णपणे मोकळी केली. मात्र या जागेवर पुन्हा अतिक्रमण केल्याने कारवाईचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी कडक पोलीस बंदोबस्तात एमएल कॅंटीनवर मनपाच्या पथकाने कारवाई केली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. कँटीनचालकाने काही वेळ कारवाई थांबविण्याची विनंती केली, मात्र अतिक्रमण विभागाचे अशोक पाटील यांनी दिलासा देण्यास नकार देत कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश दिले.
फौजदारी गुन्हा दाखल
उच्च न्यायालयाने (High Court) यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले असतानाही हे बेकायदा बांधकाम झाले होते. भविष्यात असे बेकायदा बांधकाम पुन्हा झाले तर कँटीनचालकावर कडक कारवाई होऊ शकते, अशा इशाराही न्यायालयाने दिला होता. यानंतरही बांधकाम झाल्याने या प्रकरणात फौजदारी गुन्हा (NC) दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून जेण्यात आली. कारवाईत गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, उपअभियंता प्रवीण कोटांगळे, राजेश तेलरांधे आदींनी ही कारवाई केली,
दुसऱ्यांदा हॉटेल सुरु
एमएल कँटीनच्या परिसरात बुलडोझरची () कारवाई सुरु होण्यापूर्वी सामान खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मनपाची कारवाई लक्षात घेऊन तात्काळ टेबल खुर्च्या व इतर वस्तू बाहेर काढण्यात आल्या. दरम्यान, मनपा पथकाने बुलडोझरने टिनशेड आदी पाडण्यास सुरुवात केली, एमएल कँटीनच्या संचालकाने 13 हजार 400 चौरस फूट जागेवर बेकायदा बांधकाम करून दुसऱ्यांदा हॉटेल सुरु केले होते. मनपाने दिवसभर कारवाई सुरु ठेवत संपूर्ण अतिक्रमण हटविले.
मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस, 3 आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश
नागपूरः मानेवाड्यातील चिंचमलातपुरेनगर येथील मोकळ्या जागेच्या नियोजनासाठी तेथील नागरिक कृती समितीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर 10 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानंतरही योग्यपद्धतीने नियोजन न केल्याने आता समितीने याप्रकरणी अवमानना याचिका दाखल केली आहे. शुक्रवारला त्यावर सुनावणी करताना न्या. सुनील शुक्रे व न्या. जी.ए.सानप यांनी मनपा आयुक्त (nmc commissioner) राधाकृष्णन बी., नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आणि अतिक्रमणधारकांना (To encroachers) नोटीस जारी केली. 3 आठवड्यांत यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. उज्ज्वल फसाटे यांनी बाजू मांडली.
मोकळ्या जागेच्या देखभालीत अपयश
मानेवाडा लेआऊट नकाशा मंजूर करण्यात आला होता. परंतु, पूर्ण लेआऊटमध्ये सार्वजनिक उपयोगासाठी 4 जागा निर्धारित करण्यात आली होती. या मोकळ्या जागेचे योग्यपद्धतीने नियोजन केले नाही. त्यामुळे या सर्व जागांवर अतिक्रमण झाले. प्रन्यासतर्फे अॅड. कुंटे यांनी सार्वजनिक उपयोगासाठी दाखविण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले. या निवासांना नियमित करण्याचा अर्जही फेटाळण्यात आला. गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरणाचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी नियोजन प्राधिकरणाची असल्याचे सांगण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या