नागपूर : आगामी विधासभा निवडणुकीत शिवसेनेला आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायचा याबाबत वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीहून गृहमंत्री अमित शाह येणार नाहीत, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजप या विधानसभा निवडणुकीत युतीत जास्त जागा मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजानदेश यात्रेत सांगत आहेत की युती होणारच. मात्र असे जरी असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही युती 50-50 च्या फॉर्म्युलावर (शिवसेना - भाजपला समान जागा) आधारीत नसणार.
युती होणार हे ठामपणे सांगणारे राज्यकर्ते अजून जागा वाटपाबद्दल स्पष्ट आकडा सांगू शकत नाहीत. कारण लोकसभेचे सत्ताकारण करताना युती करायची यावर तात्विक मान्यता झाली असली तरी खरा तिढा हा युती करायची का? हा नसून युतीत कोणाला किती जागा द्यायच्या याचा आहे.
यावेळी जागावाटपाचा निर्णय करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यात येणार नसून हा निर्णय सर्वस्वी राज्याकडे सोपवला आहे. तसेच जागावटपाचे सर्व अधिकार आमच्याकडे आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्येच जागा वाटपाच्या बुद्धिबळाचा सामना रंगेल हे नक्की.
2014 च्या आधी विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा हा शिवसेनेला 171 आणि भाजप 117 जागा असा होता. परंतु 2014 ला न होऊ शकलेल्या युतीचा जास्त फटका शिवसेनेला बसणार का? हा सवाल आहे. कारण आता फिफ्टी फिफ्टीची स्तिथी नाही. 2014 ला जिंकून आलेल्या जागा हा आत्ताच्या चर्चेचा पाया असणार हे स्पष्ट आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे जागा वाटपाचा फॉर्म्युला लावला तर निकाल अगदी सोपा आहे. ज्या मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांची ताकद कमी आहे. तिथे बाहेरुन आयात केलेल्या नेत्यांना तिकीट दिलं जाईल. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे या जागा भाजपलाच मिळतील.
सध्याचे विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ
भाजप - 123
शिव सेना - 63
कधी काळी स्वतःला मोठा भाऊ म्हणवणारी शिवसेना आता धाकटा भाऊ झाली आहे. ज्या शिवसेनेने सत्ता आल्यावर मुख्यमंत्री बसवला, त्या शिवसेनेचा आता उपमुख्यमंत्रीही नाही.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर विधानसभेच्या जागावाटपात भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2019 11:18 PM (IST)
कधी काळी स्वतःला मोठा भाऊ म्हणवणारी शिवसेना आता धाकटा भाऊ झाली आहे. ज्या शिवसेनेने सत्ता आल्यावर मुख्यमंत्री बसवला, त्या शिवसेनेचा आता उपमुख्यमंत्रीही नाही.
getty image
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -