Nitin Gadkari : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य लोक नाराज आहेत. पेट्रोल-डिझेलच्या पर्यायी व्यवस्थावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा पर्याय सुचवले आहेत. नागपूर येथे पेट्रोल- डिझेल संदर्भात प्रश्नाचे उत्तर देताना गडकरींनी आपल्या मनातील इच्छा बालून दाखवली आहे. ते म्हणाले की, ‘माझी इच्छा आहे की देशातून पेट्रोल-डिझेल पंप हद्दपार व्हावेत.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 'मल्टिमॉडल लॅाजेस्टिक पार्क सिंदी रेल्वे वर्धा " साठी सामंजस्य करार कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार होत आहे. हा गुडस लोजेस्टिक व पॅसेंजर लोजेस्टिक (इंटर मॉडेल स्टेशन) हब बनवला जात आहे. यासाठी आज एका विशेष कार्यक्रमात गडकरीसह वर्धेचे पालक मंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस आणि आमदार डॉक्टर पंकज भोयर ह्यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार हस्ताक्षरीत करण्यात आला. 345 एकरमध्ये हा लोजेस्टिक पार्क बनणार आहे. राष्ट्रीय महामार्ग NH-353I, NH-361 व समृद्धी महामार्ग सोबत जोडलेला असेल. तेसच नागपूर-मुंबई रेल्वेलाही जोडलेला असेल. या करारावेळी पेट्रोल-डिझेलवरील प्रश्नावर बोलताना गडकरींनी थेट पंप हद्दपार व्हावे ही इच्छा व्यक्त केली.
पेट्रोल-डिझेलला पर्याय काय?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमात अनेकदा पेट्रोल-डिझेलला पर्याय सुचवला आहे. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय. ऊसाचे साल, कॉटन, मका व तांदुळ यापासून इथेनॉल बनवता येते. यातून पेट्रोल-डिझेल ला पर्याय तर मिळेलच सोबतच रोजगार देखील निर्माण होतील.
इलेक्ट्रिक गाड्या –
इलेक्ट्रिक गाड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल. मात्र, इलेक्ट्रिक गाड्या वापरताना त्याच्या चॅर्जिंगचा आणि बॅटरीची समस्या जाणवू शकते. गडकरींनी अनेकदा इलेक्ट्रिक गाड्यासंदर्भात वक्तवे केली आहेत.