Nagpur Crime : दोन अधिकाऱ्यांनी मिळून हजेरीपटात फेरफार करत आपल्याच कंपनीचे तब्बल 11 लाख रुपये लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी (Nagpur Police) संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


ऑपरेटर मॅनेजर  शिवदासन कुन्हपन नायर (57) रा. कन्नोर, केरळ व फॅसीलीटी एक्झिकेटिव्ह ऑफीसर पद्माकर सोनवने (37) रा. सोमलवाडा, पावनभूमी अशी आरोपींची नावे आहेत. डस्ट ब्लोअर्स फॅसीलीटी मॅनेजमेट सर्वीस प्रा.लि. कंपनीकडून कार्यालयांमध्ये हाऊस किपिंगची सेवा पुरविली जाते. दोन्ही आरोपीन याच कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. सीताबर्डीतील पटवर्धन हायस्कूलजवळच्या सोनी लेन येथे कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीमार्फत नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी सेवा दिली जाते. 


मागणीनुसार कर्मचारी व हाउस किपिंग स्टाफ उपलब्ध करून दिले जातात. अटेंडंट शिटवर कर्मचाऱ्यांबाबतची माहिती भरली जाते. दोन्ही आरोपींनी ऑगस्ट 20121 ते सप्टेंबर 2022 दरम्यान स्टाफची बनावट फायनल अटेंन्डंंट शिट तयार करून तसेच खोटी नावे हजेरी पटावर दाखविले. कर्मचारी हजर नसतानाही त्यांना हजर दाखविले. यापद्धतीने त्यांनी एकूण 11 लाखांचा अपहार केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर कंपनीमार्फत सीताबर्डी ठाण्यात तक्रार देण्यात आली. प्राथमिक चौकशीत तक्रार योग्य असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


रुग्णालयातील कामात अनियमितता


बजाजनगरातील  सिम्स रुग्णालयाने कंपनीच्या कंत्राटाला मुदतवाढ दिली होती. रुग्णालय व्यवस्थापनाच्या मागणीनुसार 39 हॉउस किपिंग स्टाफ, 3 सुपरवाझर, 1 फॅसिलिटीव्ह एक्झिकेटिव्ह उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, आरोपींनी खोटी अटेंडंट तयार केली. तसेच त्यात  अधिकाऱ्यांची नावे जोडली. त्यांच्या नावावर खोटी हजेरी लावून त्यांनी हॉस्पीटलमध्ये काम केल्याचे भासविले. 


चोरट्याने पळविले 2.45 लाखांचे दागिने


नागपुरात घडलेल्या दुसऱ्या घटनेत घराला कुलूप लावून पुण्याला मुलाकडे गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी चोरी करून अज्ञात आरोपीने रोख रकमेसह 2.45 लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. प्रभाकर केशव पंडित (रा. अयोध्यानगर) हे आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह पुण्याला मुलाकडे गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडी तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरुममधील आलमारीतील सोन्याचे दागिने आणि रोख पाच हजार रुपये असा एकूण 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.


ही बातमी देखील वाचा...


Mihan Nagpur : समस्या सोडविण्याचे पुन्हा 'गाजर' ; गुंतवणूकदार अजूनही समाधानी नाही