रशियन सरकारच्या मदतीने ही टेक्नॉलाजी भारतात येणार आहे. सध्या रशियात वास्तव्यास असलेले लाल बहादूर शास्त्री यांचे पणतू सुकृत शरण या प्रकल्पाचे प्रमुख असणार आहेत. या अत्याधुनिक एअरबोटची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
कशी असेल एअरबोट?
1. रशियन सरकारच्या मदतीने जगातील एकमेव हायब्रीड एअरोबोट टेक्निक
2. बोटसाठी कारचे इंजिन, विमानाचे पंखे असणार, मात्र चालणार पाण्यावर
3. पाणी, बर्फ, वाळू अशा कोणत्याही ठिकाणी चालण्यास सक्षम
4. साधारण स्पीड बोट 20 किमी प्रतितास वेगाने जाते, तर एअर बोट ताशी 80 किमी वेगाने धावेल
5. नागपुरातल्या कोराडीत पाच एकर जागेत निर्मिती होणार
6. इंधनासाठी इथेनॉलचा वापर केल्याने टॅक्सीपेक्षाही कमी दरात प्रवास शक्य होईल.
भारतात जलवाहतुकीकडे प्रचंड दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे नद्यांचा वापर प्रवासासाठी करायचा असेल, तर असं तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.