नागपूर : महाराष्ट्रातल्या 8 हजार पॅथॉलॉजी लॅब्सपैकी 70 टक्के (5 हजार 600) लॅब्स बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केला आहे. यादव आज नागपुरात एका पॅथॉलॉजी लॅबविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.
70 टक्के बेकायदेशीर लॅब्समध्ये रुग्णांच्या विविध चाचण्या करणे आणि त्यांचे रिपोर्ट्स तयार करण्याचे काम लॅब टेक्निशियन्स करत आहेत. हे फक्त नियमांचे उल्लंघन नव्हे तर सामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळ असल्याचेही डॉ यादव यांनी सांगितले.
नागपूरसह महाराष्ट्रात अशा बेकायदेशीर आणि नियमांचे पालन न करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब्स राजरोसपणे सुरु आहेत. परंतु सरकार त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेला एकेक करुन प्रत्येक बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबविरोधात पोलीस तक्रार करावी लागत असल्याचेही डॉ यादव यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यातल्या 70 टक्के पॅथॉलॉजी लॅब्स बेकायदेशीर; पॅथॉलॉजिस्ट संघटनेचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2019 08:13 PM (IST)
महाराष्ट्रातल्या 8 हजार पॅथॉलॉजी लॅब्सपैकी 70 टक्के (5 हजार 600) लॅब्स बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -