Zomato Delivery Boy on Strike: ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी (Online Food App) झोमॅटोची (Zomato) मुंबईतील (Mumbai News) सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) आजपासून संपावर असणार आहेत. शिंदे गट (Shiv Sena : Shinde Group), प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात सर्व डिलिव्हरी बॉय हा लढा लढणार आहेत. दरम्यान, मुंबईतील झोमॅटो डिलिव्हरी बॉईजनी पुकारलेल्या संपामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या मुंबईरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
वाढता इंटरनेटचा वापरामुळे सध्या सर्वच गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून होतात. अशातच घरी आपल्याला हवं त्यावेळी ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या अॅप्सची क्रेज सध्या लोकांमध्ये वाढत आहे. अशाच अॅप्सपैकी महत्त्वाचं आणि लोकप्रिय अॅप म्हणजे, झोमॅटो. मुंबई, पुण्यासारख्या वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या शहरांमध्ये इतर शहरांतून अनेकजण नोकरी, कामधंद्यानिमित्त येऊन राहतात. घरापासून दूर राहिल्यामुळे अनेकजण ऑनलाईन फूड डिलिव्हर करणाऱ्या अॅप्सवर अवलंबून राहतात. अशाच लोकांची आज पंचाईत होणार आहे. कारण आज मुंबईतील झोमॅटोचे डिलीव्हरी बॉय संपावर गेले आहेत. आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागण्यांसाठी डिलीव्हरी बॉईजनं संप पुकारला आहे. तसेच, आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचा पवित्राही या डिलीव्हरी बॉईजनं घेतला आहे.
झोमॅटो कंपनी डिलीव्हरी बॉईजच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉईजनं घेतली आहे. मुंबईपूर्वी पुण्यातील झोमॅटो डिलीव्हरी बॉईजही संपावर गेले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत हा संप सुरूच राहील असा इशाराही झोमॅटो डिलीव्हरी बॉईजनं दिला आहे.
झोमॅटो डिलिव्हरी बॉईजच्या मागण्या काय?
- सर्व डिलिव्हरी बॉईजला समान ऑर्डर मिळाव्यात आणि पैसे वाढवून मिळावेत
- पीक अप 3 किमी आणि ड्रॉप 7 किमी असावा
- जुन्या मात्र कमी केलेल्या मुलांना पुन्हा कामावर घ्यावं
- रायडरसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही इन्शुरन्स मिळावा
- इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावा आणि इतर मागण्या