नवी दिल्ली: बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाशझोतात आलेला, झाकीर नाईकवर धर्मांतराचे आरोप होत होते. आता याप्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. झाकीरचे निकटवर्ती आर्शी कुरेशी आणि रिझवान हे दोघेही धर्मांतराची मोहिम राबवत असल्याचे समोर आले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होऊन, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ)शी धर्मांतरासाठी काही व्यक्ती संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे. यानंतर या सर्वांना कुरेशी मुंबईत बोलवत असे, तर रिझवान त्यांना मुंबईआधी पनवेललाच उतरवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करत होता.
विशेष म्हणजे, या व्यक्तींच्या धर्मांतरासोबतच त्यांचे लग्न लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कामही रिझवानच करत होता. या बद्दल्यात रिझवान यातील सर्व खर्चाचे बिल तयार करून आयआरएफकडून पैसे घेत होता. असे पोलीस तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, या खुलशानंतर या व्यक्तींच्या धर्मांतरानंतर त्यांनी आयएससारख्या संघटनेकडे पाठवतो का? या संदर्भातील चौकशी करत आहे.