मुंबई : संगणक परिचालकांच्या आंदोलनामुळे ऐन गर्दीच्या वेळी दक्षिण मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील फ्लायओव्हार चक्का जाम झाला आहे. गेल्या दीड तासांपासून संगणक परिचालकांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
ऑफीस सुटण्याच्या वेळी संगणक परिचालकांना आंदोलन केल्यामुळे घरी परतण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या संगणक परिचालकांचं वेतन गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. यापूर्वीही त्यांना अधिवेशन काळात आंदोलन केलं, पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे आता त्यांना थेट रास्तारोको केला आहे.