Yuva Sena Protest Live : इंधन दरवाढीविरोधात युवासेना आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, पाहा प्रत्येक अपडेट्स

Yuva Sena Protest Live : इंधन दरवाढी विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवासेनेकडून सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा काढत निषेध करण्यात येतोय.

abp majha web team Last Updated: 31 Oct 2021 01:25 PM
मिरजेत दरवाढीचा सायकल, बैलगाडी आणि पायी रॅली काढून तीव्र निषेध

मिरजेत शहर युवा सेनेच्यावतीने इंधन दरवाढीचा सायकल, बैलगाडी आणि पायी रॅली काढून तीव्र निषेध करण्यात आला. गांधी चौकातुन मिरज मार्केट पर्यत ही रॅली काढण्यात आली. 

दिंडोशीमध्ये सायकल रॅली

पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ युवासेना दिंडोशी तर्फे काढण्यात आलेल्या सायकल रॅली मध्ये युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवसेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनिल प्रभु सहभागी झाले. यावेळी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी सहभागी होत महागाई विरोधात, पेट्रोल गेले शंभरी पार होष में आवो मोदी सरकार.... हेच का ते अच्छे दिन... मोदी सरकार हाय हाय.... घोषणांनी परिसर दणाणून सोडला व  केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

युवासेना कोल्हापूर करवीर विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल डिझेल दरवाढ आंदोलन

युवासेना कोल्हापूर करवीर विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल डिझेल दरवाढ आंदोलन 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सायकल रॅलीत सहभागी 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सायकल रॅलीत सहभागी 

युवा सेनेच्या वतीने संगम येथे इंधन दरवाढी निषेधार्थ भव्य सायकल रॅली

युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आणि काळे झेंडे फडकवत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला .

औरंगाबादमध्ये युवासेनेचं आंदोलन

कुलाबा मतदारसंघात आंदोलन

रॅलीत गाडीला बैल जुंपत व्यक्त केला इंधन दरवाढीचा निषेध 

इंधन दरवाढीविरोधात युवा सेनेतर्फे राज्यभरात आंदोलन सुरू आहे .आज हो या पार्श्‍वभूमीवर डोंबिवलीत देखील युवा सेनेतर्फे सायकल रॅली काढत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला .या रॅलीमध्ये शेकडो युवासैनिक सायकल घेऊन सहभागी झाले होते .रॅलीमध्ये महागाईचा रावण,यम तसेच घोडे व एका गाडीला देखील बैल जुंपण्यात आले होते . डोंबिवली शिवसेना शहर शाखा ते गणपती मंदिरापर्यंत रॅली काढून इंधन दरवाढीचा युवा सेनेतर्फे निषेध करण्यात आला या रॅलीत युवा सेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. 

इंधन दरवाढी विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवासेनेकडून सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा

Yuva Sena Protest Live :  इंधन दरवाढी विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवासेनेकडून सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा काढत निषेध करण्यात येतोय. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध केला..तिकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. महागाईरुपी रावण, यम आणि घोडे देखील या रॅलीतील बैलगाडीला जुंपण्यात आले होते.. तिकडे माळशिरस आणि हिंगोलीमध्ये देखील इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. 

पार्श्वभूमी

Petrol-Diesel Price Today: देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. लागोपाठ पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आज रविवारी पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 35 पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 109.34  रुपये झालं. तर डिझेल प्रति लीटर 98.07 रुपये झालं आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये विक्रम वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.  मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 109.34 रुपये झालं तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 106.23 रुपये झाली आहे.  पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 109.79 रुपये, तर डिझेलचे दर 101.19 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.25 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.