पतंग उडवताना पाचव्या मजल्यावरुन खाली पडून तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2016 11:49 PM (IST)
मुंबई: पतंग उडवताना पाचव्या मजल्यावरुन पडून एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विरार पूर्वेच्या गोपचर पाडा इथं ही घटना घडली. 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी समीर सलिम शेख हा राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पतंग उडवत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. इमारतीच्या पॅसेजमध्ये त्याचा तोल गेल्यानं तो पाचव्या मजल्यावरुन खाली पडला. थेट डोक्यावर पडल्यानं त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.