मोक्ष मिळवून देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण, मुंबईतील योगगुरु गजाआड
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2017 10:56 AM (IST)
मुंबई : मुंबईतील शिवडीम योगगुरुला लैंगिक शोषण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. शिवराम राऊत असे या योगगुरुचे नाव आहे. मोक्ष मिळवून देण्याच्या बहाण्याने हा योगगुरु महिलांशी जवळीक करत होता. याविरोधात 4-5 महिला समोर आल्याने योगगुरुबाबत ही बाब उघडकीस आली. तसेच त्यातील एका महिलेच्या पतीने योगगुरुविरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवडीतल्या प्रबोधनकार ठाकरे हॉलमध्ये दर रविवारी शिवराम राऊत हा योगा क्लास चालवत होता बातमीचा व्हिडीओ :