Mumbai Weather Update news : राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं (Rain) धुमाकूळ घातलाय. याचा मोठा फटका नागरिकांना बसलाय. विशेष मुंबईसह (Mumbai), नवी मुंबई, ठाणे परिसरातील काही भागात जनजीव विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. काल घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे. वादळी वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीर योग्य ते नियोजन करण्याती तयारी सुरु आहे. दरम्यान, कालच्या वादळी पावसानंतर आज मुंबईतील हवामान (Weather) नेमकं कसं राहणार? याबाबतची माहिती हवामान विभागाच्या मुंबई केंद्राकडून (Mumbai Center) देण्यात आली आहे. आजही मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 


मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही मुंबईत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नारिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


घाटकोपरच्या होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू 


काल मुंबईत अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. यामुळं लोकल रेल्वेची सेवा देखील काही काळ प्रभावित झाली होती. तसेच घाटकोपरच्या होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल, आपत्ती निवारणचे कर्मचारी गेल्या 16 तास अहोरात्र काम करत आहेत. चार ते पाच भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने होर्डिंगचे भाग वेगळे केले जात आहेत. वादळी वारे आणि पावसामुलं मुंबईतील विमानसेवा देखील काल विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली आहे. यामुळं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 


मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वापवासाचा अंदाज


मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते  माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.  


महत्वाच्या बातम्या:


मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!