Yakub Memon Latest News: मुंबई बॉम्बस्फोटातला (Mumbai Bomb Blast) दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.  देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीवर जे काही कोरोना काळात सौंदर्यीकरण झाले.  उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. अशावेळी याकूब मेमन याच्या कबरीला अलिखित परवागनगी दिली. त्याचा निषेध राज्यभर होत आहे. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व त्यांनी सरकारसाठी किती अॅडजस्ट केले हे यातून स्पष्ट होते, असा थेट आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी माफी मागावी, अशी मागणी देखील भाजपनं केली आहे.  


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही याचा निषेध करत आहोत. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे.  भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने सुशोभीकरण केले त्यांना शोधून काढावे.  हे गंभीर प्रकरण आहे.  उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही मग हे कसं केलं. याचा शोध लागला पाहिजे.  उद्धव ठाकरे यांनी हे कॉम्प्रमाईज का केलं याचे उत्तर द्यायला हवे, असं बावनकुळे म्हणाले.


तेव्हाच्या गृहमंत्री यांनी काय केलं? राज्याचे मुख्यमंत्री गप्प का बसले?  त्यांना खुर्ची टिकवण्यासाठी हे करावे लागले का? असे सवालही बावनकुळे यांनी केला आहे.  ज्याने मुंबईला छिन्न विच्छिन्न केले त्याची कबर सुशोभित करणे तिला सजवणे योग्य नाही.  सरकार कारवाई करेल पण ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली. त्यामुळे यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी. राज्याच्या जनतेची माफी उद्धव ठाकरे यांनी मागावी.   मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक घटनांचे समर्थन केले असे कबूल केलं पाहिजे, असंही बावनकुळे म्हणाले. 


आशिष शेलारांचाही ठाकरेंवर निशाणा


सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहिले होते, असा निशाणा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात गेल्यावर दाऊदचे सर्मथक होते. मात्र आता ते दाऊदचे प्रचारक आहेत. कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव ठाकरे यांनी कशी दिली. सुशोभिकरणासाठी संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय, असा आरोप शेलारांनी केला. 


पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावं, असा टोलाही शेलारांनी लगावला. याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होते, असंही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Yakub Memon Grave Controversy Live Updates : याकुबची कबर कुणी सजवली? पाहा प्रत्येक अपडेट्स


याकूबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं, पोलिसांकडून बडा कब्रस्तानची पाहणी