मुंबई : अर्धवटराव, आवडाबाई, तात्याविंचू ह्या बाहुल्यांना पाहून आपल्यापैकी अनेकांचं बालपण समृद्ध झालं असेल. 21 मार्च हा जागतिक पपेट दिवस म्हणून साजरा केला जातो. शब्दभ्रमकार सत्यजीत पाध्ये यांनी अनोख्या पद्धतीने बोलक्या बाहुल्यांचा दिवस साजरा केला.

इराणचे कलाकार जावेद झोल्फाघरी यांनी या कलेला जगभरात पोहोचवलं. या निमित्त रामदास पाध्ये आणि त्याचा मुलगा सत्यजीत यांनी एक खास गाणं तयार केलं आहे. सत्यजीत पाध्ये यांनी हे गाणं लिहिलं असून संगीत, एडिटिंगही त्यांनीच लिहिलं आहे.

चिंटू सिंह या बाहुल्याने इंग्लिशमध्ये गायलेल्या गाण्यात अर्धवटराव आणि तात्या विंचूसह अनेक बाहुले आहेत.

अर्धवटरावांची शंभरी

‘अर्धवटराव’ यांनी मागच्याच वर्षी शंभरी पूर्ण केली आहे. पाध्ये कुटुंबात 2002 बोलक्या बाहुल्या आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली आहे. अर्धवटराव आणि आवडाबाई हे घरातील एक महत्त्वाचे घटक असल्याने, आम्ही राहतो त्याच ठिकाणी ते राहतात. त्यांच्यासाठी घरात स्वतंत्र खोली, कपाट, खाट अशी व्यवस्था आहे, असं रामदास पाध्ये यांनी सांगितलं होतं.

पाहा व्हिडीओ