मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील रस्त्यांवर महिला रिक्षाचालक पाहायला मिळणार आहेत. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते 35 महिला चालकांना रिक्षाच्या परवान्यांचं वाटप करण्यात आलं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कला आणि वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अशा उच्च विद्याविभूषित महिलांचाही यामध्ये समावेश आहे.
रिक्षा चालवण्याचा परवाना मिळाल्यामुळे आपण प्रचंड उत्साहात असल्याची भावना या महिला चालकांनी व्यक्त केली आहे. महिला रिक्षाचालकांसाठी वाहनपरवाना देण्याची घोषणा होताच, आपण ते मिळवण्याचा निर्धार केल्याचं एका महिलेने सांगितलं.
मुलुंडमध्ये एका सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते 35 महिला चालकांना रिक्षाच्या परवान्यांचं वाटप करण्यात आलं. मातोश्री महिला बचत गट फेडरेशन, महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक सेना, मातोश्री फाऊण्डेशन आणि टीव्हीएसच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.