इमोजीच्या माध्यमातून छेडछाड केल्याच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्या आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर वापरल्या जाणाऱ्या इमोजीआडून अश्लील मेसेज पाठवण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
या प्रकाराची उघड तक्रार केली जात नाही. कायद्याच्या कक्षेतही ती येत नाही. मात्र महिला आयोगाकडे अशा अनेक तक्रारी येत असल्याची माहिती आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीही स्थापन केली आहे.
या समितीने केलेल्या शिफारसी राज्य सरकारकडे दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून कायदे अधिक कडक करण्यासंबंधी रुपरेखा आखण्यास मदत होणार आहे.