मंगम्मा आरीगा या अंबरनाथ पश्चिमेला राहत असून अंबरनाथच्या जावसई भागात त्यांच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीत काही जणांनी त्यांना न विचारता जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू केलं. त्यामुळं मंगम्मा या आपल्या परिवारासह तिथे जाब विचारण्यासाठी गेल्या.
याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करत हल्लेखोरांना बेड्या ठोकण्याची मागणी मंगम्मा यांनी केली आहे. तर पोलिसांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
या प्रकारावर मंगम्मा यांनी जेसीबी चालकाला जाब विचारला असता चालकाने जेसीबीचा धक्का देत मंगम्मा यांना खड्ड्यात पाडलं. जेसीबीचा चालक इतक्यावरच न थांबता त्यांने नंतर मंगम्मा यांना मारहाणही करण्यात आली. या मारहाणीत मंगम्मा यांना जबर मुका मार लागला आहे. त्या सध्या न्यायासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. पण पोलिसांनी मात्र फक्त अदखलपात्र तक्रार घेत त्यांची बोळवण केली आहे. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करत हल्लेखोरांना बेड्या ठोकण्याची मागणी मंगम्मा यांनी केली आहे. तर पोलिसांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करत हल्लेखोरांना बेड्या ठोकण्याची मागणी मंगम्मा यांनी केली आहे. तर पोलिसांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.