मुंबई : जर वेळेत निदान झालं नाही तर कॅन्सर जीवघेणा आजार आहे. मात्र या आजारावरच्या औषधांचे बनावटीकरण करून मोठ्या प्रमाणात विकले जात होतं आणि रुग्णांच्या जीवाशी खेळल जात होतं. अशाच प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका महिलेला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या महिलेकडून 67 लाख 90 हजार रुपये किंमतीचे बनावट अँटी कॅन्सर ADCETRIS इंजेक्शन व ICLUSIG गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.


TAKEDA pharmaceuticals ltd ही कंपनी जपानच्या ओशाका मध्ये आहे, कॅन्सर वरचे औषध बनवण्याचे काम या कंपनीकडून केल्या जातं, अशाच प्रकारचं अँटी कॅन्सर ADCETRIS इंजेक्शन व ICLUSIG गोळ्या या कंपनीकडून बनवल्या जातात. कॅन्सर या जीव घेण्या आजारावर बऱ्यापैकी प्रतिबंध लावण्याच्या औषधे महत्त्वाचा आहे.  मात्र या औषधांचा बनावटी करून मुंबईमध्ये विविध ठिकाणी विकले जात होते.


युनायटेड ओव्हरर्सेस ट्रेडमार्क या कंपनीला भारतामध्ये औषधांचा बनावटीकरण करणाऱ्या कंपनीने विरुद्ध कायदेशीर तक्रार करण्याचे अधिकार TAKEDA pharmaceuticals ltd देण्यात आले आहेत. युनायटेड ओव्हरर्सेस ट्रेडमार्क कंपनीला माहिती मिळाली की, TAKEDA pharmaceuticals ltd या कंपनीची औषधे बनावट चेक करून बनावटीकरण करून आणि कंपनीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बनवली जात आहेत. ज्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत होता. TAKEDA pharmaceuticals ltd ओशाका जापानची कंपनी कॅन्सर या कंपनीला सुद्धा मोठ्या प्रमाणात तोटा होत होता.


तक्रार प्राप्त झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून या गोळ्यांचं आणि इंजेक्शनचा बनावटीकरण कल्याणच्या एका कंपनीत होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सीबी कंट्रोलकडून सापळा रचण्यात आला. छापा टाकल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा सापडला.


 ADCETRIS इंजेक्शनचे 7 बॉटल ज्याची प्रत्येकी किंमत 5 लाख 80 हजार आणि  ICLUSIG गोळ्यांचे 2 बॉक्स ज्यांची प्रत्येकी किंमत 13 लाख
50 हजार आणि 1 लॅपटॉप,1 मोबाईल असे एकूण 67 लाख 90 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आलं. TAKEDA pharmaceuticals ltd कम्पणीचे कुठलीही परवानगी नसताना त्यांच्या कंपनीच्या औषधांच बनावटीकरणं करून ते विकले जात होत्या आणि मोठ्या प्रमाणात त्याचा साठा करून त्या मुंबई आणि महाराष्ट्रमध्ये विविध ठिकाणी विकल्या जात होत्या.


सदरची कारवाई ही पोलिस सहआयुक्त निकेत कौशिक आर्थिक गुन्हे शाखे यांच्या आदेशानुसार आणि प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित सावंत,अनिल जायकर, पोलीस उपनिरीक्षक रुपेश दरेकर, एकनाथ देसाई, पोलीस हवालदार नाईक, जाधव, डोईफोडे, पोलीस नाईक वलेकर, दरेकर, भंडारी, यादव पोलीस शिपाई  यादव,कुंभार, शेंडगे, महिला पोलीस शिपाई गीरी,राऊत पोलीस नाईक चालक पोळ या पथकाद्वारे पार पाडण्यात आली आहे.