मुंबई : मुंबई महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर मांडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तबब्ल 12 हजार कोटींची घट झाली आहे.

मुंबईचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात आहेत. कारण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेने मोठ्या आवेशात अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष अर्थसंकल्पात या घोषणा उतरल्या आहेत का, हे पाहूया :

 शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात समाविष्ट आहेत?

  • स्वातंत्र्य संग्रामाच्या संग्रहालयासाठी तरतूद

  • नवीन उद्याने

  • सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

  • डंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया केंद्र

  • मलनि:सारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार

  • मलजल प्रक्रिया केंद्र

  • गारगाई पिंजाळ प्रकल्प, कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड

  • माहूल पंपिंग स्टेशनसाठी तरतूद

  • शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास

  • जलतरण तलाव


 शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात समाविष्ट नाहीत?

  • पालिकेच्या बजेटमध्ये 500 चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भातील तरतूद नाही

  • 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणाही हवेतच

  • विनामूल्य आरोग्यसेवा देणारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना

  • मधुमेहांवर उपचार करणारी विशेष रूग्णालये

  • आरोग्यसेवा आपल्या दारी

  • बहुरूग्णवाहिका

  • जेनेरीक मेडिसिन दुकाने

  • रात्री कचरा उचलण्याची सोय

  • जुन्या विहिरींचे पुनर्जिवित करणे

  • बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच

  • पशू आरोग्य सेवा

  • महापालिका कर्मचाऱ्यांसाठी घरकूल योजना

  • सफाई कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक साहित्य

  • फूटबॉल मैदाने व आंतरराष्टृीय नेमबाज केंद्र

  • गोवंडी येथे आंतरराष्टृीय दर्जाचे केंद्र

  • गावठाण, कोळीवाडे येथील सीआरझेडमधील मूळ बांधकामे अधिकृत करणार