मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि इतर सेलिब्रेटी ईडीच्या (ED) रडारवर आले आहेत. महादेव अॅपमुळे ईडीकडून आता बॉलिवूड सेलिब्रेटींची चौकशी करण्यात येणार आहे. छत्तीसगडमध्ये महादेव अॅपमुळे राजकीय सल्लागार, नेते अडचणीत आले. महादेव अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
महादेव अॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल अशा विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. भारतातील विविध निवडणुकांवर सट्टा लावण्यात येतो.
महादेव अॅप प्रकरणातील मोडस ऑपरेंडी काय आहे?
रणबीर कपूरने सोशल मीडियावर या अॅपची जाहिरात केली. इतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर अॅपच्या जाहिराती दिल्या. त्यानंतर या सेलिब्रेटींना हवाला ऑपरेटर्सद्वारे रक्कम देण्यात आली. ईडीने अद्याप या अभिनेते, सेलिब्रेटी, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर यांना किती रक्कम मिळाली हे उघड केलेले नाही. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 100 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवरही बेकायदेशीर महादेव अॅपचा प्रचार केल्याचा आणि त्याचा मोबदला म्हणून, मोठी रोख रक्कम स्वीकारल्याचा संशय आहे.
>> अॅप कसे काम करायचे?
- हे अॅप UAE च्या बाहेर आधारित आहे
- अॅपच्या युजर्ससाठी, अधिक ग्राहकांना वळण्यासाठी त्यांचे कॉल सेंटर्स आहेत. हे कॉल सेंटर्स नेदरलँड, नेपाळ, श्रीलंका, यूएई मधून चालवण्यात येतात.
- जेव्हा ग्राहक या केंद्रावर कॉल करतात तेव्हा त्यांना एक व्हॉट्सअॅप नंबर दिला जातो, जिथे त्यांना त्यांचे तपशील शेअर करावे लागतात.
- त्यानंतर हा तपशील भारतातील पॅनेल ऑपरेटरसोबत शेअर केला जातो. जे प्रामुख्याने भारतातील शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि चंदिगड, छत्तीसगडमधील काही लहान शहरांमध्ये कार्यरत आहेत.
- असे 4000-5000 पॅनेल ऑपरेटर आहेत. हे पॅनल ऑपरेटर UPI आणि बँक खात्यांद्वारे ग्राहकांशी बँक व्यवहार सुरू करतात.
- या पॅनल ऑपरेटर्सची बनावट बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये पैसे वळवले जातात.
- प्रक्रियेचा एक भाग म्हणून, ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी, त्यांना त्यांच्याद्वारे अॅपवर भरलेल्या रक्कमेच्या 60 टक्के परत दिले जातात.
- गुंतवणुकीच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम पॅनेल ऑपरेटरकडे असते. त्यापैकी 70 टक्के रक्कम ते त्यांच्याकडे ठेवतात. उर्वरित 30 टक्के रक्कम महादेव अॅपवर जाते.
- या पॅनेल ऑपरेटर्सचा दररोजचा सरासरी नफा दररोज 200 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे
- या खात्यातील व्यवहार दर सोमवारी महादेव अॅपद्वारे सेटल केले जातात.